तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

अभिनव विद्यालय व संस्कार विद्यालय यांच्यावतीने आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी घेतला लाभपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक परळी चे संस्थापक सजीव परळीभूषण साहेबराव फड व पद्मावती शिक्षण संस्थेचे सचिव दिपकराव तांदळे यांच्यावतीने वैद्यनाथ मंदिरास दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांसाठी बारस यानिमित्ताने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नेहरू चौक येथे शनिवारी सकाळी आठ ते अकरा यादरम्यान असंख्य भाविक भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला परळी भूषण साहेबराव फड व दीपक राव तांदळे हे समाज कार्यामध्ये नेहमीच कार्यरत असतात एक सामाजिक बांधिलकी म्हणून महाप्रसादाचा सारखे उपक्रम नेहमीच राबवत असतात महाशिवरात्रीनिमित्त परळी मध्ये पंचक्रोशीतून अनेक भाविक भक्त रात्री मुक्कामासाठी मंदिरे व धर्मशाळा याठिकाणी थांबलेले असतात शिवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे बारस शिवरात्रीचा उपवास सोडण्याचा दिवस यामुळे भाविक भक्तांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ ते अकरा यावेळेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला  हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी अभिनव विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्कार विद्यालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment