तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 26 February 2020

प्लास्टिक बंदी कार्याशाळा उत्साहात


बुलडाणा, दि. 26 :  नगर परिषद येथे 17 फेब्रुवारी 2020 रोजी प्लास्टिक बंदी कार्याशाळा उत्साहात पार पडली. कार्यक्रमाला  अमरावती येथील पर्यावरण तज्ञ नंदकिशोर गांधी यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,  विविध शासन निर्णयानुसार बंदी असलेले प्लास्टिक व वापरण्याची परवाणगी असलेले प्लास्टिक या विषयी माहिती असावी. प्लास्टिकचा मानवी व पशु आरोग्यावर होणारा परिणाम तसेच पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम याबाबत त्यांनी  विवेचन केले. स्वच्छतेबाबत व प्लास्टिक बंदी बाबत विविध उपायोजना सांगत त्यांनी स्वच्छता विषयक शपथ दिली.
              सदर कार्यशाळेत व्यापारी, विक्रेते, विविध व्यवसाय करणारे व्यक्ती, हॉटेल, खानावळ, मंगल कार्यालय चालक, विविध शासकीय कार्यालयातील प्लास्टिक बंदी संबंधित अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कार्याक्रमाचे आयोजन लेखा परीक्षक अमोल इंगळे व सुत्रसंचालन श्री. सोभागे यांनी केले. मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले, असे नगर पालिकेने  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000000

                 धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी स्वंयम योजनेकरीता अर्ज सादर करावे
*समाज कल्याण विभागाचे आवाहन
बुलडाणा, दि. 26 :  समाज कल्याण विभागामार्फत जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना 2019-20 शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 नंतरच्या मान्यप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला आहे.  परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वंयम योजना लागू करण्यात आली आहे.  या योजनेंतर्गंत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरण करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  संबंधित विद्यार्थ्यांने व शैक्षणिक संस्थेने महाडिबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचे कडे अर्ज करणे अनिवार्य आहे. त्याच प्रमाणे महाडिबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थीच योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील. अधिक माहितीसाठी इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाचा शासन निर्णय 6 सप्टेंबर 2019 चे अवलोकन करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.
           मुलभुत पात्रता धारक विद्यार्थी धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे, विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न 2.50 लाखापेक्षा  जास्त नसावे, विद्यार्थ्यांचे स्वत:चे आधार क्रमांक आपल्या राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न असावे, विद्यार्थ्यांने प्रवेश   घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या  शहराच्या ठिकाणी आहे, अशा  शहरातील विद्यार्थी रहिवासी नसावा, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 मध्ये 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. दोन वर्षापेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी योजनेचा लाभ मिळणार नाही. इयत्ता  12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्रशिक्षण , व्यवसाय शिक्षण अभ्यास क्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्याक्रम पुर्ण होईपर्यत लाभास पात्र राहील.  विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या  त्या अभ्यासक्रमाच्या परिक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील.   एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थीचे वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे, विद्यार्थी नोकरी किंवा व्यवसाय करत  नसावा, विद्यार्थ्यांला आदिवासी विकास किंवा सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. विजाभज, इमाव व विमाप्र कल्याण विभागाच्या महाडिबीटी पोर्टलमध्ये ज्यांनी अर्ज केला आहे व त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना लाभ अनुज्ञेय राहील, असे समाजकल्याण विभागातर्फे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

000000
       औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत भंगार साहित्याचा जाहीर लिलाव
*साहित्य खरेदीसाठी निविदा आमंत्रित      
बुलडाणा, दि. 26 :  औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेतील प्रशिक्षणार्थी यांना प्रात्याक्षिक करीत असतांना वापरण्यात आलेली लोखंडी व इतर निरुपयोगी  भंगार साहित्यांचा जाहिर लिलाव करण्यात येत आहे. ईच्छूक निविदा धारकांनी   16 मार्च 2020 पर्यंत निविदा सदर कराव्यात. तसेच  17 मार्च 2020 रोजी सकाळी 12.30 वाजता निविदा उघडयात येतील कोरी निविदा प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था  येथून   50 रुपये   भरुन प्राप्त कराव्यात.  उशिराने प्राप्त निविदांचा विचार करण्यात येणार नाही यांची नोंद घ्यावी.
              सदर साहित्य यादी कार्यालयीन वेळेत उपलबध करुन देण्यात येईल. सर्व निविदेतील साहित्यांची संख्या कमी, अधिक करण्याचे आणि कोणतेही कारण न देता निविदा नाकारण्याचे अधिकार प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांनी राखुन ठेवलेला आहे. निविदेच्या  शर्ती व अटी कार्यालयात उपलब्ध आहे, असे  प्राचार्य व्हि. बी. बचाटे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment