तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने 'आशा दिन ' उत्साहात साजरा ; विविध स्पर्धांना आशांचा उत्स्फूर्त प्रतिसादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
    परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने   'आशा दिन ' उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या समारंभाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती सौ. उर्मिलाताई शशिकांत गित्ते यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. 
    तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय परळी वै. अंतर्गत अशा दिवस आज दिनांक ०८. ०२.२०२० रोजी साजरा करण्यात आला. या समारंभाचे उद्घाटन पंचायत समिती सभापती साै.उर्मिलाताई गीते यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाला नगर परिषद आरोग्य सभापती किशोर पारधे, तालुका आरोग्य अधिकारी लक्ष्मण मोरे,महिला व बालविकास प्रकल्पा धिकारी व्यंकटराव हुंडेकरी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास  बबनभाउ (शशिकांत) गित्ते यांची विशेष उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राजमाता  जिजाऊ , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सभापती सौ. उर्मिलाताई गित्ते यांनी बोलताना सांगितले की,आशा स्वयंसेविकांचे आरोग्य सेवेत मोठे योगदान असून सामाजिक आरोग्य जागृती, सेवा यातून आरोग्यविषयक कार्य चालते. आशांचे हे काम कौतुकास्पद असुन सामाजिक आरोग्यासाठी आशांनी समर्पनाने काम करावे असे आवाहन केले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. 
      परळी तालुका आरोग्य कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पाककला, रांगोळी, फॅन्सी ड्रेस, गायन, वक्तृत्व आदी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्व सहभागी स्पर्धकांना सभापती साै.उर्मिलाताई गीते यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक तालुका आरोग्य अधिकारी डाॅ .लक्ष्मण मोरे  यांनी केले. सुत्रसंचलन लेखापाल विष्णू मुंडे, तालुका समुह संघटक शामल तिडके यांनी केले तर आभार प्रदर्शन गटप्रवर्तक आशा मुंडे यांनी केले. कार्यक्रमा ला सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, गट प्रवर्तक , आशा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment