तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

पालम येथे भाजपाचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न.
आरूणा शर्मा

पालम तालुका भारतीय जनता पार्टी पालमच्या वतीने तहसिल कार्यलया समोर एक दिवसीय धरणे आंदोलन  करण्यात आले
या आंदोलनाला भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम व बाळासाहेब भालेराव यांनी भेट देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तालुक्यातील शेतकऱ्यांचे पिक विमा कर्जमुक्ती दुष्काळी अनुदान कापूस खरेदीमध्ये होणारा त्रास या विषयी सविस्तर निवेदन तहसिलदार ज्योती चैव्हाण  यांना देण्यात आले.
 पुढे बोलताना डॉ. सुभाष कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडूनूक होत नाही तोपर्यंत मोठे आंदोलन उभारणार असल्याचे सांगितले.या आंदोलनात माजी सरपंच लक्ष्मणराव रोकडे,उपसभापती अन्नासाहेब किरडे,तालुका अध्यक्ष शिवाजीराव दिवटे,सभापती डॉ.रामराव उंदरे,जिल्हा ऊपघ्यक्ष लिबाजीराव टोले,  माधवराव गिनगीने, विश्वंभर बाबर,गजानन रोकडे,तुकाराम कराळे,नागनाथ खेडकर,भगवान करंजे,विठ्ठल कदम, ताराबाई कराळे, गोपीराज शिंदे, तुकाराम चाळक, विनोद किरडे, सूर्यकांत पळसकर,  मारोतराव शिंदे शेख बशीरभाई आधी शेतकरी मोठ्या प्रमाणात या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment