तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

पत्रकारांचे नेते मा. एस एम देशमुख यांना "आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार जाहीर!


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : पुणे-पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पत्रकारांचे नेते व मराठी पत्रकार परिषदेचे प्रमुख विश्वस्त मा एस एम देशमुख यांना "आचार्य अत्रे पत्रकारिता पुरस्कार!"माजी कृषी व सैनिक कल्याण राज्यमंत्री मा दादासाहेब जाधवराव यांच्या शुभहस्ते सासवड येथील आचार्य अत्रे सभागृह येथे  सोमवार दि 17 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 10.30 वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सन्मान सोहळ्यामध्ये पुरंदर हवेलीचे नूतन आमदार मा संजय चांदुकाका जगताप आणि पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष यांचाही सन्मान यावेळी करण्यात येणार असल्याचे पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जाहीर करण्यात येत आहे.

No comments:

Post a comment