तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

परळीत निष्क्रिय शासनाच्या विरोधात भाजपाचा एल्गार राज्यव्यापी धरणे आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- संजय मुंडेपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या 25 फेब्रुवारीच्या शेतकरी सोडले वाऱ्यावर, महिलांवर वाढते अत्याचाराच्या निष्क्रिय शासनाच्या विरोधात भाजपाचा एल्गार राज्यव्यापी धरणे आंदोलनास परळी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते संजय मुंडे यांनी केले आहे.


 भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली परळी तहसील कार्यालया समोर मंगळवार, दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 10 ते 3 वा. होणाऱ्या शेतकरी सोडले वाऱ्यावर, महिलांवर वाढते अत्याचाराच्या निष्क्रिय शासनाच्या विरोधात "भाजपा यलगार  राज्य व्यापी धरणे आंदोलन" होणार आहे. शेतकरी, महिला व सर्व सामान्यसह विविध प्रश्नी  तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राज्याव्यापी धरणे आंदोलन होणार आहे. या धरणे आंदोलनास परळी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिका यांनी ग्रामीण , शहर मधील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आघाडी चे पदाधिकारी, गटप्रमुख,  गणप्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शक्तीकेंद्र प्रमुख बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच,से.स.सो.चेरमन यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते संजय मुंडे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment