तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

चारठाणकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर डॉ.जगन्नाथ दी‌क्षित, गिरीश कुलकर्णी, मधु जामकर मानकरी
सेलू ( जि.परभणी ) : येथील स्वातंत्र्य सेनानी विनायकराव   चारठाणकर प्रतिष्ठानतर्फे दिलेल्या जाणार्‍या २०२० च्या  पुरस्कारासाठी  डॉ.जगन्नाथ दीक्षित, गिरीश कुलकर्णी व मधु जामकर यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे चिटणीस ॲड.श्रीकांत वाईकर यांनी दिली.
पुरस्काराचे हे ३२ वे वर्ष आहे. मराठवाड्यातील सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला क्षेत्रातील सर्वोत्तम कामगिरी बद्दल दरवर्षी तीन व्यक्तीत्वांचा सामाजिक कृतज्ञता नोंद सन्मान हा
गौरवाचा कार्यक्रम घेण्यात येतो.
या वर्षी प्रसिध्द
समाजसेवक डॉ.जगन्नाथ दीक्षित, औरंगाबाद ( सामाजिक कार्य ), प्रसिद्ध रंगकर्मी, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी, औरंगाबाद ( कला व नाट्य क्षेत्र ), तर मधु जामकर, परळी वैजनाथ ( साहित्य व समीक्षा ) यांना चारठाणकर पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख पाच हजार एक रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सोमवारी ( १७ फेब्रुवारी ) एका विशेष समारंभात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे अध्यक्षस्थानी असतील, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डी.के.देशमुख उपस्थित राहात आहात आहेत.
साई नाट्य मंदिरात सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानच्या अध्यक्षा वर्षा देशपांडे, चिटणीस ॲड.श्रीकांत वाईकर, विश्वस्त प्रा.प्रकाश कामतीकर, आर.आर.चारठाणकर, ॲड.किशोर जवळेकर, बी.एस.देशपांडे, वरूणा कुलकर्णी, बाबासाहेब चारठाणकर यांनी केले आहे.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a comment