तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

भाजपचे परळी येथे निष्क्रिय महाआघाडी सरकारविरुद्ध धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- राजेश गित्ते


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील निष्क्रिय महाविकास आघाडीच्या सरकारच्या विरोधातीत विराट धरणे आंदोलनात तहसील कार्यालय परळी वैजनाथ  मंगळवार दिनांक २५ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता होणार आहे. तरी या विराट धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केले आहे. 

    भाजपाच्या माजी मंत्री पंकजाताई मुंडे व बीड जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सोडले वाऱ्यावर, महिलांवर वाढते अत्याचाराच्या निष्क्रिय शासनाच्या विरोधात "भाजपा यलगार  परळी तहसील कार्यालया समोर मंगळवार, दि.25 फेब्रुवारी 2020 रोजी  सकाळी 10 ते 3 वा. राज्यव्यापी धरणे आंदोलन" होणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजना फसवी, 2515, शिर्षकाखालील विकासकामांना स्थगिती, मराठवाड्यातील वाँटरग्रीड योजनेला स्थगिती, जलयुक्त शिवार अभियान योजनेला स्थगिती, शेतकऱ्यांचा भुसंपदित केलेला मावेजा लवकर मिळने, शेतकऱ्यांचे अतिवृष्टी अनुदान त्वरित देणे, महिलांच्या अत्याचाराच्या घटनेत वाढ, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला स्थगिती व  शेतकरी, महिला व सर्व सामान्यसह विविध आदी प्रश्ननांवर सरकारला धारेवर धरून ताळ्यावर आणण्यासाठी आपण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात राज्याव्यापी धरणे आंदोलनास परळी तालुक्यातील भाजपाच्या पदाधिका यांनी ग्रामीण , शहर मधील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व आघाडी चे पदाधिकारी, गटप्रमुख,  गणप्रमुख,  प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शक्तीकेंद्र प्रमुख बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच,से.स.सो.चेअरमन यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते राजेश गित्ते यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment