तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

वंचित बहूजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी सुदेश पोतदार


सुभाष मुळे..
-----------------
गेवराई, दि. १५ _ वंचीत बहूजन आघाडीचे  अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने वंचित बहूजन आघाडीच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी गेवराई शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुदेश शिवाजीराव पोतदार यांची निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन केले जात आहे.
            वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे गेवराई शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुदेशराव पोतदार यांच्या कार्याची दखल घेऊन वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी पोतदार यांची वंचित बहूजन आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली. १३ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्या निवडी करण्यात आल्या, यामध्ये त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी बोलताना पोतदार म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग आपण समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव काम करणार आहोत. श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांचे विचार तळागळापर्यंत पोहचवण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहु असे प्रतीपादन सुदेशराव पोतदार यांनी केले.
        त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे जिल्हाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर, तालुकाध्यक्ष सय्यद सुभान, प्रदीप तुरुकमारे, बंटी सौंदरमल, किशोर भोले यांच्यासह पदाधिकारी यांनी  अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment