तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

महाशिवरात्री महोत्सवात मराठमोळी परंपरा हा संगीत रजनी कार्यक्रम संपन्न. हजारो मोबाईल्स ची लाईट लावत परळीकरांनी दिली मराठमोळ्या परंपरेला दादपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून परळी नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या महाशिवरात्री महोत्सवात काल (दि.२४) उदय साटम निर्मित सिनेअभिनेत्री, टिक टॉक फेम माधुरी पवार हिच्या मराठमोळी परंपरा या संगीत रजनी कार्यक्रमाने परळीकरांना अक्षरशः मोहिनी घातली.

गणेश वंदनेने सुरुवात झालेल्या या बहारदार कार्यक्रमात वासुदेवा सारख्या लोककलांना जागृत करत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे उत्कृष्ट दर्शन घडवले. त्याचबरोबर माधुरीच्या दिलखेचक अदांनी उपस्थितांची मने जिंकली.

तत्पूर्वी नारळ वाढवून हर हर महादेव च्या जयघोषात या कार्यक्रमाच्या रंगमंचाचे उदघाटन करण्यात आले; यावेळी परळी नगर परिषदेचे गटनेते वाल्मिक अण्णा कराड, रा. कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी, परळीचे तहसीलदार विपीन पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. मुंडे, न.प. सभापती किशोर पारधे, शरद मुंडे, महादेव रोडे, राजाखान पठाण, नितीन कुलकर्णी, गोपाळ आंधळे, दिनेश गजमल, राजाभाऊ पाळवदे, संतोष रोडे, अनंत इंगळे यांसह आदी उपस्थित होते.

या संगीत रजनीमध्ये उत्कृष्ट गीते व कलेचा नजराणा सादर करण्यात आला. या कार्यक्रमास परळीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत माधुरी पवार व सहकलकरांना दाद दिली. एका गीताच्या प्रसंगी तर उपस्थित सर्व प्रेक्षकांनी एकाच वेळी आपल्या मोबाईल चे टॉर्च लावून माधुरीच्या कलेला जोरदार प्रतिसाद दिला. परळीकरांनी दिलेली दाद व प्रेम पाहून आपण भारावून गेलो असल्याचे माधुरीने आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले; व उपस्थित सर्वांचे आभार मानले.

No comments:

Post a Comment