तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

बीडचे नवे जिल्हाधिकारी राहुल रेखावार


 सुभाष मुळे..
-----------------
बीड, दि. ४ _ गेल्या दोन अडीच महिन्यापासून रिक्त असलेल्या बीडच्या जिल्हाधिकारी पदी राहुल रेखावार यांची नियुक्ती झाली आहे .
      रेखावार हे मूळचे खडकी बाजार, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील रहिवासी आहेत. त्यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण नांदेड येथील पीपल्स हायस्कूलमध्ये झाले. बारावीच्या परीक्षेत ते बोर्डात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी राजस्थानमधील पिलानी येथे इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक्स याविषयात अभियांत्रिकी शाखेचे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. रेखावार यांनी भाभा अणुशक्ती केंद्रात काम केले आहे. तसेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्येही त्यांनी कामाचा अनुभव घेतला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे २०११ मध्ये घेण्यात आलेल्या नागरी सेवा परीक्षेत ते देशात १५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांनी सुरवातीला राजापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी, सिंधुदुर्गचे सहाय्यक जिल्हाधिकारी, हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही श्री. रेखावार यांनी काम पाहिले आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment