तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 8 February 2020

रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रमाई जयंती साजरी


औरंगाबाद (प्रतिनिधी) :- येथील भीमनगर , भावसिंगपुरा येथे त्यागमूर्ती रमाई बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने रामाईची 122 ची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.शिलवंत  गोपणारायन आणि सचिव रमेश पायरुजी गोपणारायन यांच्या संकल्पनेतून त्यागमुर्ती रामाईचा जयंती  उत्सव " रमाई महोत्सव २०२०" म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भन्ते करुणाबोधी यांच्या हस्ते बुद्ध वंदनेने करण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी विचारांचे अभ्यासक डॉ. मिलिंद आठवले यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, यावेळी डॉ. आठवले यांनी आपल्या भाषणात रमाईची त्यागाच्या घटना आणि बाबासाहेबांना यशस्वी होण्यासाठी जी रामाईची साथ बाबासाहेबांना होती त्याप्रमाणे जर आजच्या काळात प्रत्येक स्त्री ने आपल्या पतीला साथ आणि प्रेरणा दिली तर कुटुंबासोबतच पर्यायाने समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही , डॉ. आठवले यांनी पुढे बोलतांना  सांगितले की , बाबासाहेब ज्याप्रमाणे  स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून संघर्ष करत होते,अगदी त्याप्रमाणे रमाईचे  व्यक्तिमत्त्व समाजासमोर एक आदर्श म्हणून उभे असल्याचे सांगितले,रमाई महोत्सव साजरा करणे म्हणजे, नव्याने सांस्कृतिक परिवर्तन होतांना दिसत आहे, संस्थेच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम जसे नृत्य, गीत गायन इत्यादी घेण्यात आले तसेच उपस्थितांना खीर वाटप करण्यात आली, अध्यक्षीय समारोप प्रा. शिलवंत गोपणारायन यांनी केला.यावेळी प्रा. आशिष जावळे यांनी आपले विचार मांडतांना रमाईच्या त्यागवृत्तीचे अनुकरण आजच्या स्त्रीने करावे असे सांगितले,  भाग्यश्री इंगळे यांनी रमाईच्या जीवनावर प्रकाश टाकला, तसेच गणेश खंडाळे  यांनी बोलतांना म्हटले की , रमाईसारखी पत्नी बाबासाहेबांना मिळाली म्हणून बाबासाहेब भारतीय घटनेचे शिल्पकार होऊ शकले.तसेच अमरदीप हिवराळे यांनी सूत्रसंचालन केले व  आभार मानले.

No comments:

Post a Comment