तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

वाशिम जिल्ह्यात भुमिअभिलेख विभागातील अधिकारी एसिबीच्या जाळ्यातवाशिम उपअधिक्षक नवघरे यांना पाच हजारांची लाच घेतांना अटक 


 वाशिम : दिवसेंदिवस वाशिम जिल्ह्यामध्ये लाच प्रकरणाचा आलेख ऊंचावत असुन हे प्रमाण रोखन्यासाठी सबंधित प्रशासनही कारवाया करीत आहे.अशीच एक कारवाई वाशिम जिल्ह्यात करन्यात आली.शेतजमिन मोजणी संबंधाने भुमी अभिलेख कार्यालयाकडून नोटीस मिळाल्यानंतर  तक्रारकर्त्यास शेतामध्ये १ गुंठयाचा फायदा करुन दिल्याच्या मोबदल्यात पाच हजारांची मागणी करणारे केशव पुंडलिकराव नवघरे उपअधिक्षक भुमीअभिलेख यांना चार हजारांची लाच घेतांना रंगेहात अटक करण्याची कारवाई अँन्टी करप्शन ब्युरोने  केल्याने एकच खळबळ उडाली आहे.या संदर्भात अँन्टी करप्शन ब्युरो वाशिम कार्यालयाच्यावतीने मिळालेल्या माहिती नुसार तक्रारकर्त्यांना शेतजमिन मोजणी संबंधाने  काही दिवसापुर्वी भुमि अभिलेख कार्यालय वाशिमकडून  नोटीस मिळाली. त्यानुसार  संबंधित जमिन मोजणी करतांना तक्रारदारास शेतामध्ये एक गुंठयाचा फायदा करुन दिल्याच्या मोबदल्यात भुमि अभिलेख कार्यालयाचे उपअधिक्षक केशव नवघरे यांनी पाच हजार लाचेची मागणी केली.तक्रारकर्त्याने २५ फेब्रुवारी  रोजी चार हजार रुपये केशव नवघरे यांना देतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने चार हजाराची रक्कम स्विकारतांना भुमि अभिलेख कार्यालय वाशिम येथे अटक केली.लाचखोर अधिकार्‍यांने पंचासमक्ष लाच स्विकारल्याचे सिध्द झाल्याने  त्याला पोलिसांनी अटक  केली.सदरची कारवाई ही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधिक्षक पंजाबराव डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधिक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने केली. या पथकामध्ये सपो.उपनिरिक्षक परळकर,पोहेका टवलारकर,पोना.विनोद अवगळे,अरविंद राठोड आदी कर्मचार्‍याचा समावेश होता.लाच प्रकरणी तक्रार असल्यास लाचलुचपत विभागाकडे संपर्क करावा असे वेळोवेळी आवाहन करन्यात येत असते यातुनच जागृत तक्रारदारांमुळे भ्रष्टाचारी एसिबीच्या जाळ्यात अडकत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835

No comments:

Post a Comment