तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

आगीत दोन घरांचे लाखाचे नुकसानसेलू , दि.६ ( प्रतिनिधी ): येथील रहेमान नगर भागातील दोन घरांना गुरूवारी ( दि.६  ) अचानक लागलेल्या आगीत सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
याबाबत माहिती अशी की, नगमा रहिम शेख व रोजिया मुजिम शेख या शेतमजूर महिला आरेफखान अल्लाबक्षखान यांच्या रहेमान नगरमधील घरी किरायाने राहतात. नेहमी प्रमाणे त्या घर बंद करून सकाळी साडे दहाच्या सुमारास कामाला गेल्या. तासाभराने त्यांच्या घरातून धूराचे लोट बाहेर येत असल्याचे शेजार्‍यांना दिसले. आग वाढत जात असल्याचे लक्षात येताच लोकांनी आटोक्यात आणली. तो पर्यंत संसार पयोगी साहित्यासह नगमा यांचे ५५ हजार रुपयाचे, तर रोजिया यांचे ४० हजार रुपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. या प्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

वार्तांकन : बाबासाहेब हेलसकर

No comments:

Post a Comment