तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

गो-गर्ल-गो मोहीमेअंतर्गत मुलींच्या स्पर्धांचे आयोजन


बुलडाणा, दि. 7 : समाजातील प्रत्येक नागरिकाने शारीरिक व्यायाम करावा अथवा खेळामध्ये सहभाग घ्यावा व वैयक्तीक प्रकृती स्वास्थ राखावे यासाठी केंद्र शासनामार्फत संपूर्ण देशामध्ये फिट इंडिया मुव्हमेंट या कार्यक्रमाचे अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मुलींचे तंदुरुस्तीबाबत जागरुकता निर्माण करणेकरिता मुलगी शिकली की तिला योग्य दिशा मिळते. 

   जेव्हा ती मोठी होते, तेव्हा ती संपूर्ण कुटूंबावर प्रभाव टाकते.  “बेटी बचाव, बेटी पढाओ, बेटी खिलाओ” या उक्तीस अनुसरुन मुलींना अधिकाधिक सुविधा देऊन क्रीडा क्षेत्रातील त्‍यांचे प्राविण्य आणि वैयक्तीक स्वास्थास महत्व देणे आवश्यक आहे.  भारतामध्ये असलेली ही परंपरा टिकविणे आणि वाढविणेकरीता मुलींना अधिकाधिक क्रीडा विषयक सोयी सुविधा, मोकळे वातावरण, अधिकाधिक कौशल्य दाखविण्याची संधी, मुलींचे आरोग्याच्या योग्य सवयी तसेच न्युट्रिशन्सबाबत माहिती, मुली - महिलांमधील रक्ताची कमतरतेबाबत माहिती, स्वच्छतेबाबतच्या योग्य सवयी आदी आवश्यक माहिती उपलब्ध करुन दिली असता सर्वसाधारण मुली पर्यायाने महिलांचे देखील आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

     त्याअनुषंगाने गो-गर्ल-गो या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील  6 ते 18 वयोगटातील 100 मीटर धावण्याच्या मुलींच्या स्पर्धा आयोजित करावयाच्या आहेत.  सदर स्पर्धा 06 ते 09 वर्षापर्यंत मुली, 10 ते 13 वर्षापर्यंत मुली व 14 ते 18 वर्षापर्यंत मुली या तिन गटात आयोजित करण्यात येत असुन, त्यामध्ये फक्त 100 मीटर धावण्याच्या स्पर्धांचे आयोजन शाळास्तर, तालुकास्तर, जिल्हास्तर व राज्यस्तरापर्यंत करण्यात येत आहे.  राज्यस्तर स्पर्धा दि.08 मार्च 2020 रोजी जागतीक महिला दिनानिमित्त शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळूंगे-बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.  राज्यस्तरावरील वैशिष्ट्यपुर्ण प्राविण्य प्राप्त करणाऱ्या मुलींना त्यांचे उज्वल क्रीडा भविष्यास अनुसरुन प्रायोजक तत्वाद्वारा प्रशिक्षणाकरीता संधी उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत.  सदर स्पर्धेत शाळास्तरापासुन प्रत्येक वयोगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुली पुढील स्तरावरच्या स्पर्धेसाठी पात्र ठरतील.

        तरी  जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळा, उच्च प्राथमिक शाळा, विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय यांनी उपरोक्त वयोगटानुसार शाळास्तरावर मुलींच्या 100 मीटर धावणे या स्पर्धेचे आयोजन दि.15 फेब्रुवारी 2020 पर्यंत करावे व वयोगटनिहाय प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या मुलींना तालुकास्तरावरील स्पर्धेकरीता प्राविण्य प्राप्त खेळाडूंच्या यादीसह सहभागी करुन घ्यावे.  तालुकास्तर स्पर्धा दि.24 फेब्रुवारी 2020 पर्यंत आयोजित होत असल्याने, तालुका स्तरीय स्पर्धेच्या तारखेकरीता आपले तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी अथवा तालुका क्रीडा संयोजक यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.

                                                ****

महाडीबीटी पोर्टलवरील शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ

29 फेब्रुवारी 2020 पर्यंत स्वीकारणार अर्ज
बुलडाणा, दि. 7 : शासनाच्या सर्व प्रकारच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी पोर्टल शैक्षणिक सत्र 2019-20 या शैक्षणिक वर्षाकरीता 15 जानेवारी 2020 पर्यंत कार्यान्वीत होते. अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, म्हणून महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याकरिता 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत शासनातर्फे अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी सर्व महाविद्यालय प्राचार्य यांनी सदर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा व इतर योजनेचे अंतिम दिनांकाची सुचना विद्यार्थ्यांना लेखी कळवून तशा सूचना महाविद्यालयाच्या सूचना फलकावर लावण्यात याव्यात. भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क योजनेचा कोणताही अनुसूचित जाती, इमाव, विमाप्र व विजाभज प्रवर्गातील पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहील्यास त्यास सर्वस्वी जबाबदार संबंधीत महाविद्यालय प्राचार्य राहतील, असे सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                        ****

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती लागू

जमिन महसूलात सूट व पाल्यांच्या शाळा, महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी
बुलडाणा, दि. 7 : क्यार व महा चक्रीवादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामध्ये बहुवार्षिक पिकांचाही समावेश होता. या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या जिल्हयातील आपदग्रस्त शेतकऱ्यांना जमीन महसूलात सुट व शेतकऱ्यांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी देण्यात आली आहे.

    सदर सवलती देण्यात आलेल्या आपदग्रस्त शेतकऱ्यांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे आहे : बुलडाणा – 54380, चिखली- 80206, दे.राजा – 24793, सिं. राजा-51383, मेहकर-104785, लोणार-45270,  मलकापूर-31970, मोताळा-41382, नांदुरा-37103, खामगांव-62010, शेगांव – 38576, जळगांव जामोद-32021 व संग्रामपूर तालुक्यात 30200 शेतकरी संख्या आहे. अशाप्रकारे एकूण 6 लक्ष 34 हजार 079 शेतकऱ्यांची जिल्ह्यात संख्या आहे. या शेतकऱ्यांना महसूल व वन विभागाच्या 18 नोव्हेंबर 2019 च्या शासन निर्णयान्वये जिल्हाधिकारी यांनी सदर सवलती लागू केल्या आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.जमील पठाण
8805381333

No comments:

Post a Comment