तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

" सोलफुल सॅटरडे कराओके क्लबचा ३०० वा कार्यक्रम धुमधडाक्यात संपन्न "
 सोलफुल सॅटरडे या मुंबईतील  सर्वात मोठ्या सुप्रसिद्ध कराओके क्लबचा  300 वा कार्यक्रम मोठ्या  थाटामाटात , आणि धुमधडाक्यात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक संगीतप्रेमींच्या उपस्थितीत विलेपार्ले येथील GMES  इंग्लिश हायस्कूल हाॅल मध्ये संपन्न झाला .या संगीत मैफलीत सोलफुल सॅटरडे कराओके क्लब मधील काही निवडक अशा 40 गायक/गायिकांनी एका पेक्षा एक सरस , अविस्मरणीय , लोकप्रिय
गाणी सादर करून गायकांनी रसिकांची मने जिंकली .या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला . विशेषतः या क्लब चे संस्थापक मनी सुब्रमनीयम आणि राजेश सुब्रमण्यम यांचे हस्ते केक कापण्यात आला आणि सेलिब्रेशन करण्यात आले . या प्रसंगी क्लबचे सर्व अॅडमिन सहकारी शंकर, नारायण, योगेश, बिपीन, कमल आणि या क्लबचे पाहिले सभासद मंगेश देवकुळे रंगमंचावर उपस्थित होते. तसेच विविध क्षेत्रातील खास मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमा नंतर सर्व कलाकार आणि प्रेक्षक यांच्या साठी आयोजित केलेला प्रीतीभोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला . शेवटी या अतिशय  मनोरंजक संगीत मैफलीची आभारप्रदर्शन करून  सांगता करण्यात आली.

No comments:

Post a Comment