तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

सततच्या नापिकीला कंटाळून तरुण शेतकर्याची आत्महत्या परळी (प्रतिनीधी)


सततची नापिकी ,निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतातील उत्पन्न घटल्याने व कर्जबाजारीपणास कंटाळुन बालासाहेब बाबुराव गित्ते रा नंदागौळ वय ३५ यांनी आपल्याच शेतात दि.3 फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान काल दि 4 रोजी त्यांचा मृत्यु झाला.
  परळी तालुक्यातील नंदागौळ येथील बालासाहेब गित्ते यांना आठ एकर जमीन असुन मागील पाच वर्षांपासुन निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतातील उत्पन्न सातत्याने घटत आहे यामुळे खाजगी व काही बॅंकांचे घेतलेले कर्ज फेडता येत नसल्याने मागील काही दिवसापासुन चिंताग्रस्त होते.सध्या शेतात असलेल्या हरभरा,ज्वारी व इतर पिकांच्या फवारणी आपल्या पत्नी सोबत फवारणी करत होते.दि.3 फेब्रुवारी रोजी फवारणी करण्यासाठी गेले आसता शेतातील पिकाची परिस्थिती पाहून आपल्या पत्नी ला माझे जेवण अनण्यासाठी घरी जा आसे सांगुन घरी पाठवुन दिले व फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन केले.त्यांना उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान काल दि.4 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.30 च्या दरम्यान मृत्यु झाला.बालासाहेब गित्ते यांच्या पाश्चात आई ,पत्नी आणि दोन मुले आहेत.

No comments:

Post a comment