तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 14 February 2020

परळीत धनादेश अनादर प्रकरणी एक जणास सहामहिने तुरुंगवासात रवानापरळी वैजनाथ (प्रतिनिधी)
धनादेश अनादर झालेच्या आरोपावरून परळी येथील शिवकुमार महाजन यास परळी न्यायालयाने ६ महिने तुरुंगवासाची शिक्षा व  ५.५० लाख रुपये  नुकसान भरपाई फिर्यादीला देण्याचा आदेश झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की परळी येथील आरोपी शिवकुमार शंकराप्पा महाजन यांनी फिर्यादी सुंनदाबाई हरीभाऊ दौंड यांच्याकडून दिनांक २१.०७.२०१४ रोजी मुलीच्या लग्नासाठी रुपये  ३ लाख ७५ हजार रुपये तीन महिन्यांत परत करतो म्हणून घेतले होते.सदर रक्कम परत करण्याकरिता बॅंके आॅफ महाराष्ट्र शाखा परळीचा रुपये ३ लाख ७५ हजार रुपयेचा धनादेश दिला होता.सदर धनादेश अनादर झाले नंतर फिर्यादीने आरोपींविरुद्ध  कलम 138 निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट अन्वये फिर्याद दाखल केली होती. सदर प्रकरणात साक्षी पुरावा होऊन आरोपी शिवकुमार महाजन यास न्यायालयाने दोषी ठरवून उपरोक्त शिक्षा ठोठावण्यात आली. नुकसान भरपाईची रक्कम फिर्यादीस एका महिन्यात देण्याचे आदेश दिले आहेत. त्यास कसुर केल्यास आणखी एक महिना शिक्षा भोगायची आहे. यापुर्वी याच प्रकरणात तारखेला सतत गैरहजर राहिल्याने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. फिर्यादीच्या वतीने अॅड.वसंतराव फड, अॅड.उषा दौंड, अॅड.प्रविण फड यांनी काम पाहिले. त्यांना अॅड.आर.व्ही.गित्ते यांनी मार्गदर्शन केले.

No comments:

Post a Comment