तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

तुच हो तुझ्या रक्षणासाठी महिषासुरमर्दिनि


सुभाष मुळे..
----------------
बलात्कार झाल्यावर आपण मेणबत्ती मोर्चे काढायला कुणाकडून शिकलो माहित नाही,पण स्त्री रक्षणार्थ लंका जाळण्याचा इतिहास आहे आपला हे माञ विसरु नका......   

  एकतर्फी प्रेमातून हल्ला 
वर्धा, हिंगणघाट येथे नंदोरी चौकात प्राध्यापिका युवती चे अंगावर पेट्रोल टाकून जीवंत जाळन्याचा प्रयत्न, प्रकृति चिंताजनक, नागपुर येथे ऑरेंज सिटी हॉस्पिटल मधे भरती, आरोपी नगराळे रा. दारोडा अटक याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे 

स्त्री शक्तींनो,जागे व्हा...!!
आज आपल्या आया बहिणीवर  भर चौकात अत्याचार होत आहे,यावर मंथन करण्याची गरज आहेत.आपले कुटुंब व आपली बहीण,आपली मुलगी आजच्या "पिसाट मानवी संस्कृतीची" भक्ष बनत आहे.

       म्हणून प्रत्येकीने आपल्या मुलिंना व स्वतःला असुरक्षित न मानता त्यावर उपाय म्हणून मानसिकदृष्ट्या निराधारी न बनता या पुरूषी अविचाराला तोंड देण्यासाठी प्रत्येकीच्या कुटुंबात आपल्या मुलामुलींसोबत चर्चा घडवून आणून आपली मुले अशा पापाचे शिलेदार बनणार नाही हे संस्कार या निमित्ताने द्या.मुलिंना अशा परिस्थितीत आपल्यावर ही स्थीती येणार नाही असे संस्कार देण्याला सुरुवात करा.ह्या घटनेची कारणं अनेक असतील पण ती स्थीती आपणावर येणार नाही अशी व्यवस्था म्हणजे कुटुंबात चर्चा होणे अपेक्षित !!

       नाही की फक्त इतरांबाबत केवळ नको त्या चर्चा करू नये.एकमेकाच्या चुगलचपाट्या करण्यात आपले आयुष्य आपण खर्ची घालत आहोत याचे भान असू द्या.नेहमी समानाभुतीने जगण्यासंदर्भाने आपले विचार तयार करण्याची सकारात्मक मानसिकता तयार करा.व ती करुया..!!
     
        स्वतः व स्वतःच्या मुलीवर असे प्रसंग ओढवणार नाही यातून आपल्याला सक्षम बनविण्यासाठी स्त्री शक्तींनो जागे व्हा,जागे व्हा...!!!

खुप मोठ्ठा संदेश मी देणारा नाहीत पण काळाची पावले ओळखून आपण पुढे दिशा ठरवाव्यात हा स्वच्छ प्रामाणिक उद्देश..!!

स्ञी जन्मा ही तुझी कहानी,पण.....आज
तुच हो तुझ्या रक्षणासाठी महिषासुरमर्दिनि.

सौ.यामिनी नरेंद्र लोहार

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

1 comment: