तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथाची शासकीय पूजा संपन्न
श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत


परळी वैजनाथ(प्रतिनिधी) :- दि.21 - देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू वैद्यनाथाची शासकीय पूजा जिल्हाधिकारी बीड यांच्या हस्ते संपन्न झाली.श्री. वैद्यनाथांच्या वार्षिक उत्सवांपैकी एक असलेला महाशिवरात्री निमित्त बीड चे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी सपत्नीक प्रभू वैद्यनाथाला विधिपूर्वक रुद्राभिषेक  करण्यात आला.यावेळी गाभाऱ्यात गणेश महाडिक उपजिल्हाधिकारी,डॉ.विपीन पाटील अध्यक्ष श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट तथा तहसीलदार,अरविंद मुंडे मुख्याधिकारी न.प.,राजेश देशमुख सचिव श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट आदी उपस्थित होते.

महाशिवरात्रीनिमित्त ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिरात प्रभू वैद्यनाथाची अलंकारिक पूजा करण्यात आली आली होती.शिवरात्री दिवशी रात्री 7 च्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते मंत्रोच्चाराने रुद्राभिषेक करून महापूजा करण्यात आली.या महापूजेचे पौरोहित्य नाना आयचीत,अरुण आयचीत,बाबुराव नव्हाडे, राजाभाऊ जोशी,प्रदीप अग्निहोत्री,नागेश जोशी,गणेश टिंबे,मुरलीधर धर्माधिकारी, वामन जोशी,रवी वेताळ,सुशील पुराणिक,बाळा भटजी,भगवान बडवे आदीं ब्रह्मवृंदानी केले.यावेळी रेखावार यांनी प्रभू वैद्यनाथाचे मनोभावे पूजन केले.

शासकीय पूजेनंतर श्री वैद्यनाथ देवस्थान ट्रस्ट च्या वतीने जिल्ह्याधिकारी राहुल रेखावार यांचे देवस्थानच्या कार्यालयात वैद्यनाथाची प्रतिमा शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन स्वागत केले.हे स्वागत वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख,प्रा.बाबासाहेव देशमुख,नंदकिशोर जाजू,प्रा.प्रदीप देशमुख,अनिल तांदळे, विजयकुमार मेनकुदळे,डॉ.गुरुप्रसाद देशपांडे,नागनाथ देशमुख,रघुवीर देशमुख, शरद मोहरीर,अनिल पुजारी आदि विश्वस्तांच्या
उपस्थितीत करण्यात आले.

No comments:

Post a Comment