तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक संपन्न...वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कारवाई तात्काळ सुरू करा - अमित देशमुख

एस.आर.टी रुग्णालयाचा कायापालट होणार - धनंजय मुंडे

मुंबई (प्रतिनिधी) :-  (दि. २५) बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढाकाराने आज (दि. २५) रोजी मंत्रालयात अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील विविध प्रश्नी एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. रुग्णालयाच्या इमारत देखभाल व दुरुस्तीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीतून देणार असल्याचे या बैठकीत ना. मुंडे यांनी घोषित केले.

 त्याचबरोबर एम आर आय मशीनसह अद्ययावत सोयीसुविधा युक्त असा या दवाखान्याचा कायापालट करू असेही श्री. मुंडे म्हणाले.

अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय महाविद्यालय व रुग्णालयातील वर्ग तीन व चारची रिक्त पदे तात्काळ भरण्याच्या अनुषंगाने आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत.

वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासंदर्भातील बैठक आज घेण्यात आली.

 या बैठकीला सामाजिक न्याय मंत्री श्री. धनंजय मुंडे, आमदार श्री. संजय दौड, वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.तात्याराव लहाने, यांसह स्वा.रा.ती. चे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष देशमुख, डॉ. राकेश जाधव, डॉ. नागेश अब्दागिरे, डॉ. योगेश गालफाडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना धनंजय मुंडे यांनी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वर्ग तीन व वर्ग चार वर्गाची पदे रिक्त असल्याने वैद्यकीय सेवेवर ताण येतो. त्यामुळे ही रिक्त पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाही विभागाने तत्काळ सुरु करावी. याशिवाय स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची क्षमता वाढविताना याबाबत सविस्तर अभ्यास करुन वैद्यकीय शिक्षण विभागाने याबाबत कार्यवाही करावी.
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आवश्यक असणारे एमआरआय मशीन बसविणे, कॅथलॅब सुरु करणे आणि भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मान्यतेप्रमाणे नुतनीकरण, सर्जिकल मेडिकल स्टोअरचे अनुदान मिळविणे, रुग्णालयासाठी आवश्यक असणारे नवीन १० व्हेंटिलेटर आदी प्रश्न मांडले.

या रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी वेळोवेळी वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करावा असेही  यांनी यावेळी सूचित केले.

श्री. मुंडे यावेळी म्हणाले की, जिल्हा नियोजन निधीमधून रुग्णालयाची डागडुजी, सर्जिकल इमारतीच्या फेजचे बांधकाम, नवीन ड्रेनेज सिस्टीम करणे, सुरक्षा व स्वछता यासाठी विशेष निधी, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर व नवीन लिफ्ट साठी आवश्यक निधी, अद्ययावत व सर्व पुस्तक युक्त ग्रंथालय, याबाबत आवश्यक निधी उपलब्ध करून पाठपुरावा करुन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

मंत्री अमित देशमुख यांनीही यावेळी अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावले.

No comments:

Post a Comment