तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेत स्नेहसंमेलन धुमधडाक्यात संपन्न प्रतिनिधी 
सोनपेठ:-शहरातील कन्या शाळेत शनिवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
स्नेहसंमेलनाच्या उदघाटक जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मलाताई उत्तमराव विटेकर या होत्या तर अध्यक्षस्थानी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जिजाबाई राठोड तर प्रमुख उपस्थितीत येथील गटविकास अधिकारी सचिन खुडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा संपादक किरण स्वामी,तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश पाटील,भगवान राठोड,राजेश खेडकर,सुभाष सुरवसे,गोविंद नाईक,सुकेश यादव,गणपत कोटलवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या वेगवेगळ्या कलागुणांना अशा कार्यक्रमातुन व्यासपीठ उपलब्ध होत असते.
आणि यामुळेच यांच्यातील कलाकार आपणांस दिसुन येत असतो.भविष्यात दिसणारे वेगवेगळे कलाकार अशाच स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमांतून घडणार असतात.
त्यामुळे शाळेत होत असलेल्या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला वेगळे महत्त्व असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.
उपस्थित पालकांसह नागरिकांना बाल कलाकारांच्या भुमिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कलागुणांनी अवाक केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांसह देशाच्या संरक्षणासाठी सतत पहारा देत असलेल्या सैनिकावरील सादरीकरणाला उपस्थितांनी विशेष दाद दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक प्रदिप गायकवाड यांनी केले.तर सुत्रसंचालन परमेश्वर शिंदे यांनी तर आभार रामेश्वर राऊत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कन्या शाळेच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.विशेष सहकार्य जय भवानी मित्र मंडळ व लहुजीनगर मित्र मंडळाने केले.
यावेळी विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठी गर्दी केली होती.

No comments:

Post a Comment