तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 4 February 2020

लोकशाहित युवकांची भूमिका महत्वाची -देवेंद्र भुजबळ(प्रतिनिधी-अनुज केसरकर)       
 मुंबई दिनांक,५:            जगात आजही ५ विविध शासन व्यवस्था असून त्यातील सर्वात आधुनिक, नागरिकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य देणारी लोकशाही व्यवस्था ही एकमेव आहे, युवकांकडे परिवर्तनाचे शिलेदार म्हणून मोठया आशेने पाहिल्या जाते,यास्तव लोकशाही युवकांची भूमिका मोठी आहे, असे विचार देवेंद्र भुजबळ यांनी नुकतेच व्यक्त केले. येथील प्रख्यात के.जे. सोमय्या महाविद्यालयात ते "लोकशाही पंधरवाडा" निमित्ताने मार्गदर्शक म्हणून बोलत होते. जगातील एकूण देश, तेथील शासन व्यवस्था, त्यांच्या मर्यादा यांचा आढावा घेऊन भुजबळ यांनी लोकशाहीचं स्वरूप, महत्त्व विषद केलं.ईश्वर जसा, अदृश्य आहे, तसंच सरकार देखील अदृश्य असते, एखाद्या  वस्तूकडे, माणसाकडे बोट दाखविता येते,तसे सरकार म्हणून कोणाकडे बोट दाखविता येत नाही.        लोकशाहीचे तर आपण सर्वच  घटक असल्याने नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी मोठी आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधून शहरी,सुशिक्षित मतदार मतदानाचा हक्क न बजावत नाही याबद्दल खेद व्यक्त केला.          भुजबळ यांनी त्यांच्या शैलीत केवळ एकतर्फी भाषण न करता, सुरवातीपासूनच संवाद साधला. त्यामुळे हा संवाद  रंगतदार  झाला. प्राचार्य  प्रज्ञा प्रभू यांनी स्वागत, प्रास्ताविक केले .या संवादासाठी प्रा. अमेय महाजन,प्रा.अर्चना पाडगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले नातेसंबंध .महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनि अलका भुजबळ यांनी जागतिक कर्करोग दिनानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करत आजारात सर्व रागलोभ गळून पडतात,यास्तव  पालकांशी, मित्र मैत्रिणी यांच्या समवेतचे नाते संबंध जोपासा असं आवर्जून सांगितले. संवादास मुलामुलींची मोठी उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment