तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

मराठी भाषा ही सर्व भाषेची जननी आहे -सौ.अंजलीताई फड


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- ज्ञान प्रबोधिनी विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अभिनव विद्यालय नेहरू चौक तळ परळी वैजनाथ येथे मराठी राजभाषा दिन व चंद्रशेखर आजाद यांचा स्मृतिदिन संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जब्दे व संस्थेचे सचिव परळी भूषण साहेबराव फड यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या कोषाध्यक्षा सौ . अंजली ताई फड उपस्थित होत्या या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुसुमाग्रज व चंद्रशेखर आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली यावेळी प्रमुख अतिथी सौ . अंजली ताई यांनी मराठी भाषेविषयी आपले मनोगत व्यक्त करताना मराठी भाषा ही सर्व भाषांची जननी आहे असे प्रतिपादन केले नंतर शाळेतील सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी चंद्रशेखर आजाद यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त केले
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे राजगुरु जेलमध्ये असतांना त्यांच्या आईला आर्थिक मदत व्हावी यासाठी ते क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले. अशी माहिती सहशिक्षक सिताराम गुट्टे यांनी दिली तसेचमराठी दिनादिषयीसह शिक्षक विठ्ठल फड यांनी माहिती दिली नविष्णु वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी, १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. शिवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्‍न असे करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.मराठी आभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्त्व ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्यातल्या सखोल सहानुभूतीने त्यांना समाजाच्या सर्व थरांतील वास्तवाला भिडण्यासाठी आणि पौराणिक आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांमधील मानवी वृत्तीचा शोध घेण्यासाठी प्रवृत्त केले. त्यांच्यातल्या शोधक आणि चिकित्सक स्वभावाने त्यांना प्रत्यक्ष ईश्वरासंबंधी प्रश्न उपस्थित करायला आणि माणसाच्या समग्रतेचे आकलन करायला प्रवृत्त केले. त्यांचे समृद्ध आणि प्रगल्भ व्यक्तिमत्त्व वैविध्यपूर्ण आणि प्रसन्न रूपात त्यांच्या साहित्यात प्रतिबिंबित झाले आहे. मराठी कुसुमाग्रजांच्या कविता तरुणांना प्रेरणा देणा-या आहेत. त्यांची कणा ही कविता युवकांना स्फूर्ती देणारी आहे. अशी माहिती सहशिक्षक विठ्ठल फड यांनी दिली या कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment