तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

शालेय अभ्यास असो किंवा अभिनय, मनापासून तयारी करावी लागते-सिने अभिनेता परमेश्वर गुट्टे

विद्यावर्धिनी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी मनमोकळया मारल्या गप्पा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- 
शाळेचा अभ्यासक्रम, शाळेतील परिक्षा असल्या की आपण मनापासून अभ्यास करतो, परिक्षेची तयारी करतो तेंव्हाच या परिक्षेत यश मिळते. आमच्या चित्रपट क्षेत्रात सुद्धा असाच अभिनयाचा अभ्यास करावा लागतो तेंव्हाच चांगले यश मिळते, मालिका व आम्ही कलावंत घराघरात ओळखले जातो असे मत बाळु मामाच्या नावानं चांगभलं या टि.व्ही.मालिकेतील गाजलेली व्यक्तीरेखा मल्लप्पा म्हणजेच परळीच्या परमेश्वर गुट्टे या अभिनेत्याने व्यक्त केले.
आज दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नविन शक्तीकुंज वसाहतीतील विद्यावर्धिनी विद्यालय येथे टी.व्ही.सिरियल मधील गाजलेली मालिका बाळू मामाच्या नावाचं चांगभलं या मालिकेतील गाजलेली व्यक्तिरेखा मलप्पा परमेश्वर गुट्टे यांनी भेट दिली.गुट्टे हे परळीचे सुपुत्र आहेत. प्रारंभी विद्यावर्धिनी विद्यालयाचे मुख्याध्यापक उन्मेश मातेकर यांनी परमेश्वर गुट्टे यांचे शाल श्रीफळ देवून सत्कार केला .         
यावेळी  शाळेतील विद्यार्थ्याशी श्री गुट्टे यांनी दिलखुलास गप्पा मारल्या .विद्यार्थ्यानी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली व आपण इथपर्यंत कसे आलो कसे आलो  म्हणजे कलाकार होण्यासाठी काय-काय केले हे सर्व सांगितले व त्यांनी विद्यार्थ्याना अभ्यासाचे महत्व सांगितले .तुम्ही खूप अभ्यास करा, अभ्यासाने माणूस मोठा होतो असे सांगितले.  त्यांनी केलेल्या मालिका तु माझा सांगाती , बाळू मामाच्या नावानं चांगभलं, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज  अशा अनेक मालिका  व अनेक चित्रपटातही त्यांनी काम केलेले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक बालासाहेब हंगरगे यांनी तर आभार मुख्याध्यापक उन्मेश मातेकर यंानी मानले. यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a comment