तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

वर्ल्ड पार्लमेंटच्या विचारधारेने अविनाश आदिक प्रभावित


       सात्रळ /प्रतिनिधी
बाबासाहेब वाघचौरे  - वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशन ( डब्ल्यूसीपीए ) चे सामाजिक कार्य व विचारप्रणाली अतिशय सुंदर असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाशदादा आदिक यांनी व्यक्त केले. डब्ल्यूसीपीएचे श्रीरामपूर (महाराष्ट्र) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे, सचिव भाऊराव माळी, सदस्य भिमराज माळी यांनी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा केली.
                सोयगांव ता. कोपरगांव येथील काही शेतकऱ्यांना सरकारकडून मिळालेल्या इनामी जमीनीवर शेती विकासासाठी बँकाकडून कर्ज मिळत नाही. तसेच शासनाच्या इतर नागरी सुविधाही मिळत नाही. या मुद्दयावर संबंधीत शेतकरी अमरण उपोषणाच्या पवित्र्यात आहेत. संबंधीत अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी डब्ल्यूसीपीए करत असलेल्या कामाला मदत करण्याची ग्वाही आदिक यांनी दिली. तसेच
              डब्ल्यूसीपीए म्हणजेच जागतिक संविधान संघ समाजातील वंचीत व गुणवंत लोकांसाठी करत असलेल्या कार्याबद्दल संबंधीतांनी आदिक यांना सांगितले.

No comments:

Post a Comment