तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 5 February 2020

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विशाखा भालेराव यांना अतुल्य भारत प्रतिभा पुरस्कार जाहीरवाशिम-पुणे येथे होणार्‍या १३ व्या अखिल भारतीय प्रतिभा पुरस्कार-२०२० आयोजीत असुन या संम्मेलनामध्ये  जेष्ठ सामाजीककर्त्या आदरनिय विशाखाताई प्रकाश भालेराव यांची यंदाचा "अतुल्य भारत प्रतिभा पुरस्कार"साठी निवड झालेली असुन हा राष्टीय स्तरावरचा पुरस्कार आहे,हा पुरस्कार सोहळा दि.९ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आयोजीत आहे.विशाखाताई भालेराव यांचे सामाजिक क्षेञात वाखानन्याजोगे काम असुन विविध सामाजिक कार्यासाठी त्या प्रत्यक्ष ठोस मदत करतात तसेच शिक्षणासाठी ऊपेक्षितांना केलेली मदत ऊल्लेखनिय आहे.प्रबोधन विचारमंच गृपतर्फे दरवर्षी राबविन्यात येत असलेल्या सामाजिक ऊपक्रमासाठी नेहमीच योगदान देत असुन तळागाळातल्या लोकांसाठी कार्य करणे त्यांना आवडते.हा समाजकार्याचा वारसा हा त्यांनी त्यांचे जीवनसाथी प्रकाशजी भालेराव यांचेकडुन जोपासला असुन त्यांचे पश्चातही विशाखाताई त्यांचे कार्य पुढे चालवत असुन शेवटच्या क्षणापर्यत सामाजीक ॠण फेडीन असे ऊद्गार या पुरस्कार निवडीच्या निमित्ताने काढले.हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल विशाखा भालेराव यांचे सर्व स्तरातुन अभिनंदन आणी त्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दीक शुभेच्छा मिळत आहेत.

फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.9763007835,8459273206

No comments:

Post a Comment