तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

युथ इंटकच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरीपदी दत्तात्रय गुट्टे


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  इंटकचे महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या संघटनेतील दैदिप्यमान कार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली गेली असुन युथ इंटकच्या राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणुन त्यांची  नुकतीच नियुक्ती करण्यात आली असुन इंटकसारख्या व्यापक संघटनेच्या राष्ट्रीय पातळीवरील जनरल सेक्रेटरी पदाचा मान गुट्टे यांच्या रुपाने परळीला मिळाला असल्याने या निवडीचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
 युथ इंटक च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत इंटक च्या राज्यनिहाय कार्याचा आढावा घेण्यात आला.इंटकचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांनी आपल्या कार्यकाळात संघटनेतील सदस्यांच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले.अधिवेशनाच्या माध्यमातुन अनेक प्रश्न सोडविले.त्यांच्या कार्यकाळात इंटक संघटनेची महाराष्ट्रात मोठी वाढ झाली.दत्तात्रय गुट्टे यांच्या या संघटनकौशल्याचा राष्ट्रीय पातळीवर संघटनेला लाभ व्हावा व संघटनेचे कार्य अधिक जोमाने व्हावे यासाठी दत्तात्रय गुट्टे यांची युथ इंटक च्या राष्ट्रीय सेक्रेटरीपदी युथ इंटक चे राष्ट्रीय अध्यक्ष संजय गाबा यांनी एका पत्राद्वारे ही निवड केली आहे.इंटक चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.जी.संजीव रेड्डी यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले.युथ इंटक सारख्या व्यापक संघटनेच्या राष्ट्रीय सेक्रेटरी पदावर परळी सारख्या ग्रामीण भागातुन निवड झाल्याने दत्तात्रय गुट्टे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.  

 कामगार विरोधी कायद्याविरोधात लढा उभारु-गुट्टे 
केंद्रातील मोदी सरकार कामगार विरोधी कायदे आणुन कामगार कायदे संपुष्टात आणत आहे.केंद्र सरकारच्या या कामगार विरोधी धोरणाला कडक विरोध करुन यासाठी भविष्यात कामगारांचा लढा उभारणार असल्याचे युथ इंटक चे नवनिर्वाचित राष्ट्रीय सेक्रेटरी दत्तात्रय गुट्टे यांनी सांगीतले.

No comments:

Post a Comment