तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

ग्रामस्वच्छता व गावफेरी उत्साहात;ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद
 परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) :- तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे रविवार, दि.२३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.००वा. ग्रामस्वच्छता कार्यक्रम घेण्यात आला.महिलांसह ग्रामस्थांचा त्यास  चांगला प्रतिसाद मिळाला.
मगील शनिवार,दि.१५ फेब्रुवारी रोजी झालेल्या ग्रामस्वच्छता कार्यक्रमात  अर्ध्यागावातील रस्त्त्यांची साफसफाई व गावफेरी पूर्ण केली होती. उर्वरित रस्त्यांची साफसफाई व गावफेरी आज पूर्ण करण्यात आली.हनुमान मंदीर समोरूनच साफसफाईस प्रारंभ करण्यात आला.मंदिराच्या बाजूच्या रस्त्यावरून मंदिरमागील भागातील रस्त्यांच्या साफसफाईस प्रारंभ करण्यात आला. साफसफाईचा शेवट, देविच्या मंदिर परिसरातील गाजर गवत काढून करण्यात आला.
        या गावफेरीत आवश्यक असेलतर साफसफाई  अथवा   ग्रामस्थांना स्वच्छतेसंदर्भातील सुचना देण्याचे काम करण्यात आले.वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन ग्रामस्थ जवळपास करत असल्याचे या फेरीत लक्षात आले.
.गावातील महिला,षुरूष आता आपापल्या घरासमोरील प्रांगण ,नाली साफ करू लागले आहेत. गाव स्वच्छ ठेवण्याकडे ग्रामस्थांचा कल वाढत आहे. लहान मुलांवरही स्वच्छतेचे संस्कार हळूहळू होत आहेत.तेही ग्रामस्वच्छतेत सहभाग घेत आहेत.आता महिलांचा सहभागही वाढत आहे .स्वच्छ प्रांगण,रस्ते,परिसर ठेवणं आता हळूहळू प्रतिष्ठेचं लक्षण ठरत आहे.
या ग्रामस्वच्छता कार्यक्रमात वर्धीनी सौ.मीनाक्षी भागवत मुंडे,सौ.सुलभा खुशाल कांबळे,,आशा कर्यकर्ती सौ.अर्चना निवृत्ती केकान, ,अंगणवाडी कार्यकर्ती सुमेधा श्रीराम  मुंडे यांच्यासह  सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती चे प्रसिध्दी प्रमुख मनोज भरतराव मुंडे,कार्याध्यक्ष विश्वनाथ बंकटराव मुंडे,उपाध्यक्ष विश्वांभर ज्ञानोबा दोडके,कोषाध्यक्ष शिवाजी रामराव मुंडे,सहसचिव इंद्रमोहन पंढरीनाथ मुंडे,विशेष सल्लागार रामराव साहेबराव दिवटे(नाना),सदस्य सर्वश्री बालाजी धोंडिबा बनसोडे,मंचक रामकृष्ण मुंडे,द्ता दादाराव कराड,बळीराम सोमेश्वर मुंडे,ज्ञानेश्वर सोमनाथ गित्ते,संस्थापक अध्यक्ष अशोक लिंबाजी मुंडे ,ग्रामस्थ आदिनाथ सौदागर दोडके,रूस्तुमराव जाधव यांच्यासह बच्चे कंपणीत गोविंद भानुदास दिवटे,रोहन बालाजी खाडे,अ्विराज गणेश दिवटेआदी  उपस्थित होते.

No comments:

Post a Comment