तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

तालुक्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करा.-भाई मोहन गुंड


केज (प्रतिनिधी) :-
    शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या हामी भाव खरेदी केंद्र केज  तालुक्यामध्ये अद्यापही सुरू नाही तालुक्यातील शेतकऱ्यांना इतर तालुक्यांमध्ये तूर आणि हरभरा घेऊन जाव लागत आसल्यामुळे शासकिय खरेदी केंद्र केज येथे सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे शेकापचे भाई मोहन गुंड यांनी केली आहे
केज तालुक्यात खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे दुसऱ्या तालुक्यात शेती माल विकायला गेल्यास  आर्थिक बुर्दडं सहन करावा लागत आहे, जवळपास एक महिना लोटला जिल्ह्यांमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू झाले आहेत,मात्र केज मधी केद्र सुरु नाही  तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असताना देखील केज संदर्भात दुजाभाव होत आहे, तालुक्यात तुर हरभऱ्याचा मोठ्या प्रमाणावर पेरा आहे,हे लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्र सुरू करावा आशी मागणी जिल्हा मार्केटिंग अधिकारी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे आठ दिवसांमध्ये शासकीय खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा शेकापचे भाई मोहन गुंड प्रवीण खोडसे अशोक रोडे महेश गायकवाड मंगेश देशमुख बाबाराजे गायकवाड प्रमोद पवार शिवसेनेचे नसीर इनामदार जलालोदिन यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment