तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

सोयगांव (वेस ) येथे आदिवासी शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न


सात्रळ /प्रतिनिधी  - कोपरगांव तालुक्यातील सोयगांव (वेस ) येथील आदिवासी, बहुजन मागासवर्गीय शेतकऱ्यांचा मेळावा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशिनचे (डब्ल्यूसीपीए) महाराष्ट्र ( श्रीरामपूर ) चॅप्टरचे अध्यक्ष दत्ता विघावे व प्रमुख वक्ते डब्ल्यूसीपीएचे सचिव भाऊराव माळी हे होते.तर अध्यक्षस्थान मच्छिंद्र बर्डे यांनी भूषविले.  डब्ल्यूसीपीएच्या पारंपारीक रिवाजा प्रमाणे तुळशीला जलदान करून उद्घाटन करण्यात आले.
             कोपरगांव तालुक्यातील सोयगांव, वेस व परिसरांतील आदिवासी शेतकऱ्यांवर मोठया प्रमाणात अन्याय होत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोशिएशिन मोठे प्रयत्न करत असून त्यासाठी प्राथमिक पातळी तहसिहलदार, प्रांत, कलेक्टर, कमिशनर, कृषीमंत्री , मुख्यमंत्री राज्यपाल अश्या सर्वांना भेटून या प्रश्नावर मार्गाने  तोडगा काढण्याचे डब्ल्यूसीपीएचे नियोजन आहे.
              सदर आदिवासी , बहुजन मागासवर्गीय शेतकऱ्यांना शासनाने शेतजमीनी इनामी दिल्या आहेत. परंतु हे शेतकरी अतिशय गरीब व मागासलेले असल्याने स्वखर्चाने सदर शेतात पिक उत्पादने करू शकत नाहीत. या जमीनीत पिकांसाठी पाण्याची व्यवस्था नाही. पावसाच्या अनियमिततेमुळे त्यांना पिकेही घेता येत नाहीत. शासनाच्या, बँकाच्या काही जटील नियमामुळे त्यांना त्यासाठी कर्जही मिळत नसल्यामुळे शेतीचा विकासही होत नाही. त्यामुळे असून अडचण व नसून खोळंबा बनलेली ही शेतजमीन शेतकऱ्यांसाठी कुचकामी ठरत आहे. त्यासाठी शासनाकडून सदर शेतीला वर्ग -१चा दर्जा मिळावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
उजनी प्रकल्पांतर्गत या गावात पाणी साठवण तलाव कोथ्यावधी रुपये खर्च करून बांधला आहे परंतु त्याचा काहीही लाभ सदर शेतकऱ्यांना पोहचत नाही याबाबत सखोल चौकशी व्हावी असा ठराव मेळाव्यात एकमताने करण्यात आला. सुत्रसंचलन संजयराव बर्डे यांनी केले.

No comments:

Post a Comment