तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

परळी तहसिल कार्यालया समोर एस.टि.कामगाराचे तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरू
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
 येथील तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेले माजलगाव रा.प.म.आगारातील बस चालक (बिल्ला क्रमांक ३२९) बाळकृष्ण दत्तात्र्य पेंन्टुळे हे परळी तालुक्यातील हाळम या गावचे रहिवासी असून सध्या ते माजलगाव रा.प.म.आगारात चालक म्हणून कार्यरत होते.मात्र एसटी आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जातास कंटाळून व त्यांना आगार प्रमुखांनी राजीनामा मागितल्यामुळे आणि विविध धमक्या दिल्यामुळे तसेच मानसिक त्रास दिल्यामुळे त्यांनी  ९ डिसेंबर २०१९ रोजी माजलगाव एस टि.आगार व्यवस्थापकांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला होता.परंतु तोच राजीनामा रापम बीड विभागातून पत्राद्वारे कळविण्यात आले की, तुम्ही दिलेला राजीनामा नामंजूर करण्यात आला असून आपण माजलगाव रापम आगारात रुजू व्हावे. परंतु वरिष्ठांच्या जाचामुळे व देत असलेल्या मानसिक त्रासामुळे चालक बाळकृष्ण पेंन्टुळे यांनी माजलगाव आगार वगळून इतर आगार देण्यात यावे यासाठी मागणी करूनही बदली न झाल्याने शेवटी कंटाळून परळी येथील तहसील कार्यालयासमोर दिनांक ११ फेब्रुवारी बुधवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.ते आजही तिसऱ्या दिवशी सुरूच होते.त्यांना रापम बीड विभागातून कुठलेही लिखित आश्वासन अद्यापही मिळाले नसून ते मिळेपर्यंत आपण हे उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे बाळकृष्ण पेंन्टुळे यांनी म्हटले आहे. यावेळी उपोषण अनेकांनी भेट दिली तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे युवा नेते माधव मुंडे यांनी वरिष्ठांशी बोलून यावर चर्चा करून तोडगा काढावे असे. सांगितले.

No comments:

Post a comment