तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

बदलत्या जिवनशैलीमुळे पर्यावरणाच्या ऱ्हासातून मुक्त होणे आवश्यक : तज्ञांचे मत


तेजन्युज हेडलाईन्स प्रतिनिधी
सोनपेठ: येथील कै. रमेश वरपुडकर महाविद्यालयात पर्यावरण ऱ्हासाचा समाजावरील परिणाम या विषयावरील चर्चासत्रात भारतामधून एकत्रीत आलेल्या तज्ञांची मते यावेळी मांडण्यात आली, या चर्चासत्रात तज्ञांच्या मते संपूर्णतः बदलती जीवनशैली कारणीभूत असून त्यावर आता गांभिर्यांने उपाययोजना करणे आवश्यक आहे.
शहरातील कै.रमेश वरपुडकर महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अमेझॉन व आस्ट्रेलियातील जंगलातील वनवा, जमिनीचे प्रदुषण, सागरी जीवनावर होणारे परिणाम अशा व त्यावरील उपाय योजनांच्या अनुषंगाने या चर्चा सत्रात चर्चा झाली. प्राचार्य डॉ. हरिदास राठोड हे बीजभाषक, तर प्रा. डॉ. डी. जी. उजळंबे, प्रा. एस. डी. ढवळे, प्रा. डॉ. आर. एम. कदम, महेश जाधव उपस्थित होते.
या वेळी उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी मा. आ. व्यकंटराव कदम, उद्घाटक म्हणून हरिसिंग गौर विद्यापीठाच्या मानवसंसाधन विकास विभागाच्या अकँडमिक स्टाफ कॉलेजचे संचालक प्राचार्य डॉ. आर. टी. बेदरे, प्राचार्य डॉ. एच. बी. राठोड, परमेश्वरराव कदम, प्रा. डॉ. डी. जी. उजळंबे, प्राचार्य डॉ. वसंत सातपुते, प्राचार्य डॉ. ए. वाय. दळवे, इजि. चंद्रकांत लोमटे, पत्रकार सुग्रीव दाढेल, गणेश पाटील समन्वयक प्रा. डॉ. सुनिता टेंगसे, सह समन्वयक प्रा.डॉ. मुकुंदराज पाटील हे होते.
समारोप प्रसंगी ज्योतीताई कदम अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख पाहूणे अधिसभा सदस्य प्रा. डॉ. आशोकराव मोटे, प्राचार्य डॉ. हरिभाऊ कदम आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा. डॉ. बापुराव आंधळे यांनी तर आभार प्रा. एम.डी.कच्छवे, प्रा. मुक्ता सोमवंशी यांनी मानले, या चर्चासत्राचे सहसमन्वयक प्रा. पी. टी. जोंधळे, प्रा. प्रणीता लंगडे यांच्यासह सर्व प्राध्यापक व सहभागीत उपस्थित होते.

No comments:

Post a Comment