तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

मंत्रालय परिसरातील पांढर्या गाडीतून पांढरे शुभ्र पुढारी कपडे विकणारा ऊसतोड कामगाराचा मुलगा आलम पुढारी यांचा चिखली (नाथ) ते मंत्रालय पर्यंतचा यशस्वी प्रवास तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा आलमचा मानस


बाळू राऊत प्रतिनिधी
मुंबई : मंत्रालयाच्या बाहेर आकाशावणी परिसरात इंडिका कारमधून कपडे विकणारा एक तरुण नेहमीच सर्वांचे लक्ष वेधून घेत असतो. सर्वांशी हसतमुख व आपुलकीने वागणाऱ्या या तरुणाने अल्पावधीतच कापड व्यवसायात आपला चांगलाच जम बसविला. आज सर्वसामान्य राजकीय कार्यकर्त्यांपासून ते अगदी नेत्यांपर्यंत सर्वजणच त्याच्या कपड्यांचे ग्राहक आहेत. आलम बशीर शेख असे या युवकाचे नाव. परंतु कपड्याच्या व्यवसायाने आलमची ही ओळख मागे पडून आलम ‘पुढारी’ अशी नवी ओळख त्याला लाभली.
बीड जिल्ह्याची ओळख ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून आहे. राज्यात दरवर्षी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ऊस तोडणी मजूर कामासाठी पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकात स्थलांतरित होतो.मराठवाड्यातलं बीडच्या पाटोदा तालुक्यातलं चिखली (नाथ) हे एक छोटंसं खेडं. याच खेड्यात बशीर भिक्कन शेख, आपली आई, पत्नी शहाजानबी, मुलगा आलम आणि ४ मुलींसह राहत होता. बशीर आणि शहाजानबी ऊसतोड कामगार होते. हे शेख दाम्पत्य प्रचंड मेहनती. ऊस तोडून जो रोजगार मिळायचा त्यातून आपल्या कुटुंबाचं कसंबसं पोट भरत होते. आलमचं प्राथमिक शिक्षण चिखली (नाथ) मधल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं. आठवी ते दहावी चिखली (नाथ) मध्ये गहिणीनाथ विद्यालयात तो शिकला. पाटोद्याच्या मूगगावातल्या आर अॅण्ड डी कनिष्ठ महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाला. सध्या तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत आर्ट्स, कॉमर्स, सायन्स महाविद्यालय, कुसळंब येथे विज्ञान शाखेतून पदवीच्या तिसर्या वर्गात शिकत आहे. शिका आणि कमवा या प्रमाणे तो कष्ट करत आहे आणि नवयुवकांना हे प्रेरणादायी आहे.
लहानपणापासून आलम तसा हुशार तल्लख बुद्धी असलेल्या युवक पण गरिबी माणसाला नेहमी चटके देत असते. आपल्या अम्मी-अब्बाला ऊस तोडताना पाहून आपणही घरासाठी काहीतरी केलं पाहिजे, ही तळमळ उराशी होती. त्यात मित्रमंडळींमध्ये मुंबईची, इथल्या नोकरीची, छानछोकी आयुष्याची चर्चा असायची. आपण मुंबईलाच गेलो तर... खूप पैसे कमावू. अम्मी-अब्बाला दुसर्याच्या शेतात राबायची गरज भासणार नाही. पण, मुंबईला जाणार कसं, हा यक्षप्रश्न होताच. अम्मी-अब्बाकडे तर पैसे नसणार आणि असलेच तरी मुंबईला जाण्यासाठी त्यांनी कधीच दिले नसते. मित्रांपैकी कोणी आपल्याला देईल, असं पण कोणी नाही. करायचं काय? या विवंचनेत असताना आजीचा बटवा त्याला दिसला. आजीने जपून ठेवलेले पाचशे रुपये त्याने घेतले. सरळ मुंबईची ट्रेन पकडली, ती सुद्धा तिकिटाविना आणि २६ डिसेंबर २०१६ ला सीएसटीला उतरला. दोन दिवसांच्या खाण्यापिण्यातच खिशातले पैसे संपले.
आलमला पुढार्यांचं लहानपणापासून आकर्षण. मंत्रालय परिसरात त्यांना तो पाहायचा आणि नंतर मरीन ड्राईव्ह समुद्रकिनार्याच्या परिसरात हिंडायचा. बरेच दिवस गेल्यानंतर त्याच्याजवळील पैसे संपले होते. तो सुलभ शौचालयात अंघोळीला गेला. मात्र, खिशातले पैसे संपले होते. अंघोळीसाठी पाच रुपये पण नव्हते. काय करायचं असा गळ्याशी हात लावून विचार करत असताना हाताला गळ्यातलं सोन्याचं लॉकेट लागलं. त्याच्या अम्मी-अब्बूने बनवलेलं.त्याने ते लॉकेट विकलं. ३४०० रुपये त्यातून मिळाले. मस्त अंघोळ केली. पोटभर खाऊन घेतलं. नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मस्त खादीचा पँट शर्ट घालून चकाचक पुढार्यासारखा बनून मंत्रालय परिसरात तो फिरू लागला. तेवढ्यात एकजण तिथे आले. त्यांनी आलमला हे कपडे कुठून आणले असं विचारलं. त्या व्यक्तीला हे कपडे मित्रासाठी हवे होते आणि ते पण तातडीने. काही सेकंदातच आलम बोलला की, “हे कपडे आम्ही आणून विकतो.” दुकान कुठे आहे विचारल्यानंतर म्हणाला, “आमचा कारभार मोबाईलवरून चालतो.” त्या व्यक्तीने एका ड्रेसची ऑर्डर दिली. पैसे आगाऊ द्यावे लागतील. त्या व्यक्तीने थोडा विचार केला. ओठावरचं मिसरूड न फुटलेल्या त्या मुलाचा आत्मविश्वास पाहून त्याने आलमला पैसेही दिले. काही वेळात कपडे घेऊन आलम आला. ती व्यक्ती खुश झाली. तो व्यक्ती एका राष्ट्रीय पक्षाचा आमदार होता. आलमचा प्रामाणिकपणा त्यांना भावला. त्यांच्या चेहर्यावरचा आनंद पाहून आलमने त्यांना त्यांच्या वर्तुळातील अन्य मित्रांना आलमकडून कपडे घेण्याविषयीची शिफारस करण्याची विनंती केली. मोठ्या दिलाने त्या आमदाराने काही मित्रांचे संदर्भ आलमला दिले. १ जानेवारी, २०१७ रोजी आलमने एका दिवसात ९ ते १० हजार रुपये निव्वळ खादीचे पांढरे कपडे विकून मिळवले.
या पैशातून त्याने मंत्रालयाबाहेर कपडे विकण्यास सुरुवात केली. अनेक आमदार त्याच्याकडूनच खादीचे कपडे खरेदी करू लागले. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे, आमदार बाबाजानी दुर्राणी, तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुरेश धस, भिमराव धोंडे, अशा सर्वपक्षीय आमदारांनी आलमला खूप मदत केली. ७० ते ८० सर्वपक्षीय आमदारांच्या पाठिंब्यामुळेच आलमचा ‘आलम पुढारी’ झाला. ‘पुढारी’ नावाने त्याने स्वत:चा ब्रॅण्ड प्रस्थापित केला. एका वर्षाच्या आत आमदार निवास येथील पुढारी वस्त्रभांडाराचा तो मालक झाला. विधानसभा आणि विधान परिषदेचे असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यातील अंदाजे ६६ महिला आमदार आणि ५० इतर आमदार सोडून उरलेले आमदार आलमच्या ‘पुढारी’ ब्रॅण्डचे खादीचे कपडे परिधान करतात. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात ‘पुढारी वस्त्रभांडार’ सुरू करून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचा आलमचा मानस आहे. एक ऊसतोड कामगाराचा मुलगा ते एका वस्त्रभांडार साखळीचा मालक हा आलम पुढारी
आलमला सर्वात जास्त त्याच्या पडत्या काळात जी साथ मिळाली ती विनोद तावडे यांची ती ही गोष्ट आजही आवर्जून सांगतात

No comments:

Post a Comment