तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

कन्या प्रशालेत मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा


बाळू राऊत प्रतिनिधी 
 मुंबई :विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतलेले आहेत.मराठी मातृभाषेने आपल्याला बोलायला शिकविले,लिहायला शिकवले,आपले विचार व्यक्त करायला शिकवले त्या मातृभाषेप्रती आपला असलेला आदर,निष्ठा,व्यक्त करण्याचा आजचा दिवस.मराठी भाषा ज्यांच्या लेखणीमुळे इतकी समृद्ध झाली ते म्हणजे वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दि.२७ फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो.
         त्याचप्रमाणे यावर्षी सुध्दा मराठी राजभाषेचा बहुमान वाढविण्याच्या दृष्टीने व मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या अनुषंगाने जि.प.कन्या प्रशाला आष्टी येथे मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
           यावेळी इ.९ वी च्या विद्यार्थीनीं प्रतिक्षा तवले,यशांजली सुर्यवंशी,मयुरी पारेकर यांनी स्वागत गीत सादर करुन कार्यक्रमाला रंगत आणली.तसेच यावेळी इ.१ ली ते इ.४ थी च्या विद्यार्थीनींनी हावभावयुक्त कविता सादर करुन सर्वांना कुसुमाग्रज यांची आठवण काढण्यास भाग पाडले.तसेच इ.९ वी ची विद्यार्थीनी कु.प्रसन्ना पोतदार हिने माझ्या भाषेची कवणे ही कविता मंजुळ आवाजात सादर करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले.
                 याप्रसंगी राजेंद्र लाड यांनी शाळेतील सर्व विद्यार्थीनींना मराठी भाषा प्रतिज्ञा दिली.तसेच इ.१ ली ते इ. ४ थी च्या विद्यार्थीनींना उत्कृष्ट हावभावयुक्त कविता सादर केल्याबद्दल रामा भालेराव यांनी त्यांच्यावतीने खाऊ वाटप केला.कु.प्रसन्ना पोतदार हीने सुंदर कविता गायन केल्याबद्दल जि.प.शाळा मुलांची आष्टी येथील शिक्षक रविंद्र भोसले यांनी २०१ रुपयांचे बक्षिस दिले.
                  मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन विभाग प्रमुख रुक्मिनी करपे यांनी करुन आभार मानले तर बहारदार सुत्रसंचलन इ.४ थी ची विद्यार्थीनीं वैष्णवी सतिश लाड हिने करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शरद राऊत,मंदाकिनी गर्जे,ज्योती शिंदे,रोहीणी कार्ले,अश्विनी धस,सुनेत्रा गायकवाड,राजश्री धस यांनी कठोर परिश्रम घेतले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक आबासाहेब खताळ,अरुण भापकर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment