तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

परळी शहर व तालुका पत्रकार संघाच्या कुटुंबियांची रक्त तपासणी शिबिरपरळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी उपजिल्हा रूग्णालयतर्फे परळी शहर व तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची रक्त तपासणी करण्यात येणार असुन पत्रकार बांधवानीं याचा लाभ घ्यावा असे पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धीरज जंगले यांनी केले आहे.
समाजाच्या प्रश्नानां वाचा फोडणारे, उपेक्षीतांना न्याय मिळावा म्हणुन बातमीला प्राधान्य देवुन शासनाला जागे करण्याचे काम पत्रकाराला सजग राहुन करावे लागते या साठी त्याला नेहमी धावपळ करावी लागते आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास कधी,कधी पत्रकाराला वेळ मिळत नाही म्हणुन समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्यां पत्रकारांचे व त्यांच्या कुटुंबाचे आरोग्य चांगले रहावे या साठी दि.27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे रक्त तपासणी शिबीर पत्रकार व त्यांच्या कुटुंबासाठी उपजिल्हा रूग्णालय परळीच्या वतीने ठेवण्यात आले असुन या रक्त तपासणीत कावीळ, एच.बी., थायरॉईड,एच.आय.व्ही.शुगर अशा वेगवेगळ्या रक्त तपासण्या करण्यात येणार आहेत.तरी सर्व पत्रकार बांधवांनी आपल्या कुटुंबासह या रक्त तपासणी शिबिरास सकाळी उपाशीपोटी येवुन रक्त तपासणी करुन घ्यावी असे आवाहन पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष धीरज जंगले यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment