तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Saturday, 15 February 2020

" विरार मध्ये प्यार भरे नगमे आप के लिये मैफल रंगली "


धुम म्युझिकल अॅकॅडमी प्रेझेंट  " प्यार भरे नगमे , आप के लिए " ही लोकप्रिय , सुपरडुपर , गाजलेल्या ,अविस्मरणीय व अवीट गोडीच्या हिंदी प्रेमगीतांची 
मैफल विरारच्या पद्मश्री भाऊसाहेब वर्तक हाॅलमध्ये रंगली . या व्हॅलेंटाईन डे विशेष कार्यक्रमात शैलजा कानडे , सुहास कुलकर्णी, सुनील नाईक , सुमना मुखर्जी , राखी मारकर , उदय शिरूर , विनोद खामकर , उदेश शिंदे , आणि के.थाॅमस या गायकांनी गायलेल्या एका पेक्षा एक सरस लोकप्रिय प्रेमगीतांना मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात प्रचंड प्रतिसाद दिला. विशेषतः  लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड फेमस शीळ वादक उदय शिरूर यांनी सादर केलेल्या " ये शाम मस्तानी " या सदाबहार गाण्याच्या शीळ वादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले . या वेळी राष्ट्रभक्तीपर गीते सादर करून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या वीर भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदन निवेदक विनोद देशमुखयांनी केले .या कार्यक्रमाला श्री .आजीव पाटील ( संघटक सचिव बहुजन विकास आघाडी ) श्री . सखाराम महाडिक  ( सभापती प्रभाग ए समिती वसई विरार महानगरपालिका ) श्री . हार्दिक राऊत ( नगरसेवक वसई विरार महानगरपालिका ) आदी मान्यवर उपस्थित होते .

No comments:

Post a Comment