तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतिने रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसादपरळीत कब्बडी सह मैदानी स्पर्धा आयोजित कराव्यात-चंदुलाल बियाणी

रक्तदान केल्याने रक्त कमी नाही तर वाढतच जाते-डॉ.सतिश गुठे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-

आपल्या शरीरात सुमारे 5 ते 6 लिटर एवढे रक्त वेगवेगळया रक्त वाहिन्यातून धावत असते. रक्त आपल्या शरीरातील एक महत्वाचा घटक असून रक्तदान केल्याने आपले आयुष्य घटत नसते, रक्त कमी होत नसते तर ते अधिकच वाढत जाते असे मत डॉ.सतिश गुठे यांनी व्यक्त केले. दरम्यान अरिहंत जैन सेवाभावी संस्थेने सामाजिक उपक्रमासोबतच परळीत कब्बड्डी व अन्य स्पर्धांचेही आयोजन करावे असे आवाहन मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी यंानी केले.परळी येथील अरिहंत जैन सेवाभावी संस्थेच्या वतिने रविवार दि.23 फेब्रुवारी रोजी भव्य रक्तदान शिबीर, मोफत दमा,  श्वसनविकार व रक्त तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. अक्षदा मंगल कार्यालयात रविवारी या शिबीराचे उदघाटन टाटा टिस्कॉनचे सिनिअर मॅनेजर राकेश खानेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मारवाडी युवा मंचचे अध्यक्ष चंदुलाल बियाणी, जेष्ठ नेते भास्करमामा चाटे, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष अभयकुमार वाकेकर, डॉ.सतिश गुठे, डॉ.वैभव डुबे, डॉ.पुनमचंद कांकरीया, सामाजिक कार्यकर्ते धरमचंद बडेरा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक अरिहंत जैन सेवाभावी संस्थेचे धीरज बडेरा यांनी केले. सर्व अतिथींचे स्वागत अरिहंत जैन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रीतम बोरा, सचिव धीरज बडेरा, उपाध्यक्ष कुलभूषण जैन, जिग्नेश जैन, आशिष गादीया, डॉ.दिनेश लोढा, रूपेश ललवाणी, संतोष ललवाणी, महावीर कांकरीया, राहुल राका, नितीन लोढा, दिपक भंडारी, प्रकाश वर्मा आदींनी केले. या शिबीरात 200 पेक्षा अधिक दात्यांनी रक्तदान केले. तत्पुर्वी दमा, श्वसनविकार तसेच रक्त तपासणी शिबीर पार पडले. आभार डॉ.दिनेश लोढा तर संचलन पत्रकार प्रशांत प्र.जोशी यंानी केले.

No comments:

Post a Comment