तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Friday, 7 February 2020

कलावंतांवरील भ्याड हल्ल्याचा निषेधसुभाष मुळे..
---------------
गेवराई, दि. ७ _ ईगतपुरी तालुक्यातील साकुर या गावातील जत्रेत दि. ४ फेब्रुवारी २०२० रोजी मध्यरात्री दोन वाजता प्रसिद्ध लोककलावंत श्री. तुकाराम खेडकर यांसह मांजरवाडीकर यांचा तमाशाचा कार्यक्रम संपल्यानंतर काही गावगुंडांनी पुन्हा तमाशा सादर करण्याविषयी बळजबरी केली, हा पुन्हा कार्यक्रम करणे शक्य नसल्यामुळे असमर्थता दर्शविणाऱ्या या तमाशातील कलावंतांना बेजरब मारहाण करण्यात आली, महिला कलावंतांचा विनयभंग देखील करण्याचा प्रयत्न झाला व नासधूस करण्यात आली, यात अनेक कलावंत जखमी झाले.
   गावगुंडांचे हे कृत्य अत्यंत निंदनीय असून कलावंतांच्या हक्क आणि अधिकारावर गदा आणणारे आहे.लोककला व लोकसंस्कृती जीवंत ठेवणाऱ्या लोककलावंतांवरील या भ्याड हल्ल्याचा गेवराईकर कलावंतांनी तिव्र निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान हल्लेखोरांवर कडक कार्यवाही करुन  लोककलावंतांना संरक्षण देणे बाबतचे निवेदन गेवराई येथे तहसीलदार यांना देण्यात आले.
       याप्रसंगी अॅ ड. सुभाष निकम व शाहीर विलास सोनवणे यांनी या घटने विषयी निषेध करणारे विचार व्यक्त करण्यात आले. या हल्ल्याचा गेवराई येथील अॅड. कमलाकर देशमुख, अॅड. सुभाष निकम, शाहीर विलास सोनवणे, प्रशांत रूईकर, प्रा.शरद सदाफुले, प्रा. राजेंद्र बरकसे, रणजित सराटे, ज्ञानेश्वर मोटे, श्रीकृष्ण कनपुरे, प्रकाश दावणगिरे, प्रकाश भुते, दिपक गिरी, आनंद दाभाडे, कैलास टोणपे, गणेश पाटील, जालिंदर पिसाळ, विष्णुप्रसाद खेत्रे, विठ्ठल वादे, अंबादास सातपुते, सुमेध भोले, महेश नागरे ,प्रभाकर कुटे या कलावंतांनी तिव्र निषेध केला आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment