तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

स्व नितिन महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची सहल


प्रतिनिधी
पाथरी:-येथील स्व नितिन महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाची औद्योगीक,एैतिहासिक स्थळे निरिक्षणा साठी शैक्षणिक सहल संपन्न झाली.

या वेळी प्राचार्य डॉ राम फुन्ने यांच्या मार्गदर्शना खाली वाणिज्य विभागप्रमुख प्रा डॉ भारत निर्वळ यांच्या नेतृत्वात पाथरी-महाबळेश्वर,प्रतापगड,रायगड,मुरूड,जंजिरा,नारायणगाव,जेजूरी, गोदावरी अॅग्रोइंडस्ट्री,शहागड. या ठिकाणी ही सहल रवाना झाली .या सहलीत औद्येगिक क्षेत्रातील समस्या व संधी तसेच स्वयंरोजगार निर्मिती कशी करावी  या विषयीचा अभ्यास व उद्योगपती डॉ संभाजी चोथे यांचा अनुभव व प्रेरणा विद्यार्थ्यांनी आत्मसात केली.या सोबतच एैतिहासिक स्थळांना भेटी देत अभ्यास केला. ही शैक्षणिक सहल शनिवार दि ८ फेब्रवारी रोजी पाथरी येथून रवाना झाली होती. पाचव्या दिवशी १२ फेब्रुवारी बुधवार रोजी परत आली. या सहलीत मुलं ३१ आणि मुली १३ प्रा डॉ आर एम जाधव, प्रा सुरेखा पवार यांचा सामावेश होता.

No comments:

Post a Comment