तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Tuesday, 25 February 2020

चौसाळा नांदूर रस्त्याचे काम निकृष्ट


चौसाळा (प्रतिनिधी) :- चौसाळा नांदूर रस्त्याचे बोगस काम आमदार संदीप क्षीरसागर यांनी तात्काळ बंद करण्याचे आदेश सा.बां विभागाचेअधीक्षक अभियंता सानप यांना दिले होते. मात्र गुत्तेदार व सानप यांच्याकडून या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली. हा प्रश्न या रस्त्यावरील सरपंचांनी उचलला होता मात्र लोकप्रतिनिधींच्या नाकावर टिच्चून अधिकारी व गुत्तेदार मुजोरपणा दाखवत आहे. ज्या रस्त्याचे काम झाले आहे तो चार ते पाच दिवसातच उखडत चालला आहे.त्यांच्या मुजोरपणाला संदीप भैय्या क्षीरसागर आळा कसा घालणार ? गुत्तेदाराची मान्यता रद्द करणार का ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत.
                       चौसाळा -- नांदूर रस्त्याचे काम सुरू असून हे काम बोगस होत असल्याच्या तक्रारी व बातम्या यांची दखल घेऊन सजग असणारे आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांनी तात्काळ काम बंद करण्याचे आदेश अधीक्षक अभियंता सानप यांना दिले होते. कामाचा दर्जा ची पाहणी मी स्वतः करणार असून जोपर्यंत या कामाची पाहणी होत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवण्यात यावेत असे स्पष्ट आदेश संदीप क्षीरसागर यांनी दिले होते. मात्र संदीप क्षीरसागर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत सानप यांनी गुत्तेदाराच्या माध्यमातून काम सुरू ठेवले आहे. यासंदर्भात सानप यांच्याशी संपर्क साधला असता मी गुत्तेदाराला निरोप दिला आहे. तो एक-दोन दिवसांमध्ये काम बंद करेल असे सांगण्यात आले. दोन दिवसात या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम पूर्ण करण्याचा विडा सानप यांनी उचलला आहे. एकंदरच लोकप्रतिनिधीची दिशाभूल करत आपला स्वार्थ साधून घेण्याचा प्रयत्न गुत्तेदार व सानप यांच्याकडून होत आहे. हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे आहे की चार ते पाच दिवसातच या रस्त्याला एक एक फुटाचे खड्डे पडायला सुरुवात झाली आहे.
 एकंदरच अधिकारी व गुत्तेदार यांचा मुजोरपणा वाढला आहे ह्याला संदीप भैया आपल्या स्टाईलमध्ये आळा घालणार का ? सानप वर कारवाई करणार का? गुत्तेदाराच लायसन्स रद्द करणार का ? असे प्रश्न जनतेतून विचारले जात आहेत. भैय्यासाहेब अधिकारी जर असे आपल्या आदेशाला केराची टोपली दाखवत असलेले तर याचा परिणाम आपल्या भविष्यातील वाटचालीवर होऊ शकतो. आणि तो परिणाम करण्यासाठीच आपल्याभोवती रचली जात असलेले हे षड्यंत्र आहे काय ? याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment