तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 27 February 2020

ब्रेकिंग न्युज; भगवान गडावरील भगवान बाबांच्या रायफलची चोरी


     
  अहमदनगर (प्रतिनिधी) :-                                                                                                                                                                                                                                                                  
अहमदनगर जिल्ह्यांतील सीमेवर असलेल्या, पाथर्डी तालुक्यातील खरवंडी गावाच्या बाजूला डोंगरावर वसलेल्या  भगवानगडावर असलेल्या, भगवान बाबांच्या वापरातील वस्तूंच्या संग्रहातील 2 बोअरची रायफल सापडत नसल्याचे आज (ता.27) सकाळी उघडकीस आले. या संदर्भात पाथर्डी पोलिस ठाण्याला प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक राठोड हे भगवान गडावर गेले आहेत. गडावरील सीसीटीव्ही फूटेजची तपासणी केल्यानंतर काही माहिती पोलिसांच्या हाती आली आहे. त्यानुसार, मध्यरात्रीच्या सुमारास एका दुचाकीवर आलेल्या तिघांनी रायफल घेऊन गेल्याचे दिसत आहे. त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. दरम्यान याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख आणि जागृत तीर्थक्षेत्र म्हणून श्रीक्षेत्र भगवानगड हे ओळखले जाते.भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे हे भव्य संग्रहालय आहे.

No comments:

Post a Comment