तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

रिवायत फेस्टिवलचे पहिले पर्व उत्साहात संपन्न





मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चर्चगेट येथील कॉलेज ऑफ सोशल वर्क (स्वायत्त) निर्मला निकेतन ह्या महाविद्यालातर्फे १९ फेब्रवारी २०२० रोजी 'रिवायत - सोशियो कल्चरल फेस्ट' गोरेगाव मधील सेंट पायस कॅम्पस येथील विस्तार केंद्रात पार पडला. सामाजिक मूल्ये यांचा प्रसार हा ह्या फेस्टचा मुख्य हेतू होता. त्यावर आधारित पोस्टर मेकिंग, नृत्य, पथनाट्य, शॉर्ट फिल्म अशा स्पर्धांचे आयोजन केले होते. फेस्ट मधील स्पर्धांमध्ये २१ महाविद्यालयांच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. रिवायत फेस्टच्या पहिल्या पर्वाचे बेस्ट कॉलेज पुरस्कार मिळवण्यात भांडुपच्या एन. ई. एस रत्नम कॉलेज ने बाजी मारली. 
फेस्टमध्ये युवापिढीला संविधानीक मूल्यांचे महत्त्व, जातीय सलोखा अशा अनेक गोष्टींचा सहज व सोप्या पद्धतीने अर्थ आणि महत्त्व सांगण्यात आले. फेस्टमध्ये विद्यार्थांना मनोरंजन मिळावे म्हणून रॅप परफॉर्मन्स, कंटेंट क्रिएशन असे विविध कार्यक्रम देखील आयोजित केले गेले. तरुण वर्गाला कला व विज्ञान स्पर्धांमधून समाजाप्रती जागरूकता आणि जबाबदारी ह्यांचे तंत्र उलगडले. तसेच सध्या गरजेचे असलेला पर्यावरण संवर्धन ह्या विषयी देखील विद्यार्थांना माहिती मिळाली. ह्या फेस्टच्या माध्यमातून युवा पिढीला त्यांचे विचार, मत, कला दाखवण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले.
फेस्टच्या उद्घाटन प्रसंगी कॉलेज ऑफ सोशल वर्क (स्वायत्त) निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. लिडवीन डायस, विद्यार्थी संघटनेचे संयोजक एल्विस थॉमस आणि शिक्षकेतर कर्मचारी ह्यांनी फेस्ट मध्ये उपस्थित राहून खूप सहकार्य केले. देशातील सत्य परिस्थिती समोर ठेऊन सामाजिक, पर्यावरण निगडित स्पर्धा आयोजित केल्याने विद्यार्थ्यांनी भरघोस प्रतिसाद देऊन वेगळा अनुभव घेतला. त्याचसोबत फेस्टची सांगता गेस्ट परफॉर्मर अँग्री प्राश - युट्युबर आणि कॉमेडियन आणि रॅपर
टप्पोरिस पॅराडाईस - रॅपर व बीटबॉक्सर ग्रुप तसेच वाइल्ड नेशन - रॅपर ग्रुप यांच्या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात झाली.

परीक्षक म्हणून "तत्त्व२सत्त्व" शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी अलंकार म्हात्रे व रोनाल्ड डिसिल्वा "नचले" नृत्य स्पर्धेसाठी पुजा काळे व अपेक्षा घाटकर, "आर्ट अॅटॅक" पोस्टर विथ स्लोगन स्पर्धेसाठी गुरुदत्त वाकदेकर व प्रणय माने, "१०तक" पथनाट्य स्पर्धेसाठी संदेश लाळगे व अजय कलढोणे आदी मान्यवर विविध स्पर्धांसाठी लाभले.

बक्षीस वितरण प्राचार्य लीडविंन डायस ह्यांच्या हस्ते झाले. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. पोस्टर मेकिंग विथ स्लोगन (प्रथम क्रमांक) विक्रांत आव्हाड (साठ्ये महाविद्यालय), (द्वितीय) हर्षद शेगार (बिर्ला महाविद्यालय), (तृतीय) निहाल मेस्त्री (रत्नम महाविद्यालय), नचले नृत्य स्पर्धा (प्रथम) मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स, (द्वितीय) एम.एल. डहाणूकर, (तृतीय) साठ्ये महाविद्यालय, तत्व२सत्व (शॉर्ट फिल्म) (प्रथम) एन.ई.एस. रत्नम, (द्वितीय) एन.ई.एस. रत्नम, (तृतीय) विवेक कॉलेज, १०तक (पथनाट्य) (प्रथम) साठ्ये कॉलेज, विलेपार्ले, (द्वितीय) एस.एस.टी. कॉलेज, उल्हासनगर, (तृतीय) एन.इ.एस. रत्नम कॉलेज यांनी पारितोषिक पटकावले.

सर्वोत्कृष्ट (CL) कंटिनजेंट लिडर - भाग्यश्री चव्हाण साठ्ये कॉलेज, विलेपार्ले, सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक (कॉलेज ऑफ सोशल वर्क मधील) आशना घोष व लिजो वेल्लीयमकंढथिल यांची निवड समितीने केली.

सदर फेस्टिवल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लोकमत, नवभारत, नवराष्ट्र, द कॅम्पस मीडिया, द एज्युकेशन ट्री (युथ कम्युनिटी पार्टनर), कॅम्पस ब्लॉगर (कॅम्पस ब्लॉगिंग पार्टनर) यांनी मिडिया पार्टनर म्हणून काम केले. तसेच सिंडीकेट बँक, फास्ट सोल्युशन, जेसीना मरीन सर्विसेस, मिकवा मिनरल वॉटर, द्रोणा फौंडेशन, रुसा (राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान), राजेंद्र मेस्त्री लाईट्स यांनी मोलाचे सहकार्य केले. 

फेस्टच्या आयोजन समितीमध्ये यज्ञेश कदम फेस्ट हेड, प्रणव टोम्पे जॉईंट फेस्ट हेड, अडमिनिस्ट्रेशन हेड ऐश्वर्या मेस्त्री ,फायनान्स हेड सिद्धी कदम, सिक्युरिटी हेड सईद खान आणि अक्षय महाजन, क्रीटीव्ह हेड ध्रुव गोएंका, पब्लिक रेलशन्स हेड स्नेहा दयाळ, मार्केटिंग हेड एॅनेट आणि ह्रिजुळ, प्रोमोशन कॅम्पिंगनिंग हेड वेनंसीओ, फूड हॉस्पिटॅलिटी हेड सोनल, सुशांत आणि प्रणिल, फ्लोर लॉगिस्टिकस निर्मिती भोर आणि विजय, प्रदर्शक हेड डेल्फिना, शॉर्ट फिल्म (तत्त्व२सत्त्व) इव्हेंट हेड रॉय पेरीरा, डान्स (नचले) इव्हेंट हेड सनोबर शेख , स्ट्रीटप्ले (१०तक) इव्हेंट हेड श्यामराव जाधव, पोस्टर विथ स्लोग्न (आर्ट अटॅक) इव्हेंट आणि जॉइन्ट क्रिएटिव्ह हेड निमिषा जाधव यांनी फेस्टिवलचे सुयोग्य नियोजन केले.

No comments:

Post a Comment