तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 6 February 2020

नाव्हलगावच्या सरपंचाचे पद जिल्हाधिकाऱ्यांनी केले रद्द ग्राम विकास अधिकाऱ्यां वर शिस्तभंगाची कार्यवाहीआरूणा शर्मा


पालम :- तालुक्यातील नाव्हलगाव येथील ग्रामपंचायत चे सरपंच संगिता मूलगिर यांनी ग्रामपंचायत द्वारे घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा मासिक बैठका न घेतल्याच्या कारणाने दिनांक 3,1 नंतर आदेशान्वये उर्वरित कालावधीसाठी सरपंच पद रद्द करण्याचे आदेश परभणीचे जिल्हाधिकारी पि. शिवाशंकर यांनी काढले आहे.
  तालुक्यातील नाव्हलगाव येथील सरपंच संगीता मुलगीर यांनी ग्रामपंचायत द्वारे घेण्यात येणाऱ्या मासिक बैठका व ग्रामसभा न घेतल्या कारणाने नाव्हलगाव येथील बाळासाहेब शिवाजी शिंदे यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 7(1) व 36 दिनांक 19,9,2019 रोजी अॅडवोकेट बि. एस. दळवे यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल करण्यात आले होते या अपील ची दखल जिल्हाधिकारी यांनी तक्रारीची दखल घेत दोन्ही पक्षकारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. देण्यात आलेल्या आदेशानंतर कुणीही उपस्थित न राहिल्याने जिल्हाधिकारी यांनी दि. 31 रोजी नाव्हलगावचे सरपंच संगीता मुलगिर यांचे सरपंच पद रद्द करण्यात आले व ग्राम विकास अधिकारी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात अाले आहे.

No comments:

Post a comment