तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

गेवराई : २४ व २५ रोजी स्काऊट गाईड, कब-बुलबल मेळावा

सुभाष मुळे..
----------------
गेवराई, दि. २२ _ तालुक्यातील उमापूर येथे दिनांक २४ ते २५ फेब्रुवारी या  कालावधीत तालुका स्तरीय स्काऊट-गाईड, कब-बुलबुल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याची पूर्वतयारी अंतीम टप्प्यात आली आहे. गेवराई तालुक्यातील २ हजार विद्यार्थी या मेळाव्यात सहभागी होणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
            चतुर्थ तालुकास्तरीय स्काऊट- गाईड, कब-बुलबुल मेळावा हा उमापूर येथील जि.प.शाळा उमापूर च्या प्रांगणात  आयोजित करण्यात आला आहे. या आधी तालुक्यातील धोंडराई, तळणेवाडी , राक्षसभूवन येथे हा मेळावा उत्साहात पार पडला असून या वर्षी उमापूर येथे संपन्न होत आहे. स्काऊट गाईड चे राज्य आयुक्त संतोष मानुरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या मेळाव्याचे उद्घाटन होणार आहे.या मेळाव्यात विविध भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल असून शोभायात्रा, शेकोटी कार्यक्रम, साहसी स्पर्धा, हस्तकला- चित्रकला वस्तूंचे प्रदर्शन आदी कार्यक्रम पार पडणार आहेत. या साठी गटशिक्षणाधिकारी विठ्ठल राठोड साहेब याच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांची स्थापना झालेली असून  त्यांची तयारी अंतीम टप्प्यात आली आहे.  मेळावा यशस्वी करण्यासाठी उमापुर येथील ग्रामस्थ,शालेय व्यवस्थापन समिती तसेच जि.प.कें. प्रा.शा. व जि.प.मा.शा. आणी जि. प.प्रा.शा.(उर्दू)उमापुर व केंद्रातील शिक्षक या केंद्राचे केंद्रप्रमुख श्री अंकुश चव्हाण  , जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मिलींद तुरुकमारे, प्रविण काळम पाटील, तालुकाध्यक्ष अमोल वैद्य, मुख्याध्यापक बालाजी मावची सर, मनोज ठाकूर सर व सर्व सदस्य आणि विविध समित्यांमधील शिक्षक बंधु-भगिनी यांचे सहकार्य लाभत आहे. 
        मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून या मेळाव्यात जवळपास २ हजार विद्यार्थी सहभागी होणार असून या मेळाव्या दरम्यान आयोजित भरगच्च कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

╭════════════╮
   ▌प्रतिनिधी 'सुभाष मुळे' गेवराई, बीड
--------------------------------
 'तेजन्यूज हेडलाईन्स' आॅनलाईन वेबवाहीनी
मो.नं./व्हाॅट्स अॅप : 94 2224 3787  ▌
                   ╰════════════╯

No comments:

Post a Comment