तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Monday, 24 February 2020

राज्यातील हजारो संगणकपरिचालक मुंबईत आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करणार“आपले सरकार” प्रकल्पातील संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळात सामावून घेण्याची मागणी

आपले सरकार प्रकल्पात CSC-SPV कंपनीने केला ३०० कोटींचा घोटाळा !

मुंबई(प्रतींनिधी) :- सध्या मुंबई येथे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सुमारे २३ हजार संगणकपरिचालकांना सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे आजाद मैदानावर येऊन दिलेल्या शब्दानुसार राज्यातील ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट् माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून नियुक्ती कर्मचारी म्हणून नियुक्ती द्यावी व वेतनाची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पातून करावी तसेच आपले सरकार प्रकल्पात सुमारे ३०० कोटी रूपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दिल्लीच्या CSC –SPV कंपनीवर कारवाई करावी अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझाद मैदानावर १६ मार्च पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे.

        याबाबत सविस्तर वृत्त की,मागील ८ वर्षापासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत व डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायती मधील संगणकपरिचालक करत आहेत.त्यात ३३ प्रकारचे विविध दाखले देणे,सर्व प्रकारच्या ऑनलाईन नोंदी ठेवणे,जमा-खर्चाची नोंद घेणे यासह लाखो शेतकर्‍यांचे कर्जमाफीचे अर्ज ऑनलाईन करणे,पिकविमा योजना,घरकुल योजनेचा सर्व्हे करणे आदि अनेक प्रकारची कामे संगणकपरिचालक करतात परंतु संगणकपरिचालकाना अतिशय तुटपुंजे असे ६००० रु मानधन निश्चित असताना ते सुद्धा एक-एक वर्ष मिळत नाही.राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आय.टी.महामंडळाच्या माध्यमातून एका कायमस्वरूपी कर्मचार्‍याची आवश्यकता असताना शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेले आहे.त्यामुळे राज्य संगणकपरिचालक संघटनेच्या माध्यमातून नागपुर,मुंबई तसेच राज्यभरात अनेक आंदोलने केली परंतु तत्कालीन शासनाने केवळ आश्वासन देऊन संगणकपरिचालकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले.मागील हिवाळी अधिवेशना दरम्यान २९ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंबई येथील आजाद मैदानावरिल संगणकपरिचालकांच्या आंदोलनाला सध्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती तसेच ३० नोव्हेंबर २०१८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना राज्यातील संगणकपरिचालकाना १० दिवसात बैठक घेऊन आय.टी.महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते.परंतु त्यांनी ०९ सप्टेंबर २०१९ रोजी ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाला आदेश देऊन आपले सरकार प्रकल्पातील सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळात सामावून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती.परंतु ३ महीने होऊन सुद्धा संगणकपरिचालकांना आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती मिळाली नसल्यामुळे दरम्यान च्या काळात संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांना निवेदने देऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली असता अद्याप पर्यंत शासनाने काहीच हालचाल केलेली नाही.त्यामूळे १६ मार्च पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायतीचे संगणकपरिचालक कामबंद आंदोलन सुरू करतील व सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आझाद मैदानावर १६ मार्च पासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे राज्यअध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिला आहे.

CSC-SPV कंपनीने आपले सरकार प्रकल्पात केला ३०० कोटींचा भ्रष्टाचार!

आपले सरकार प्रकल्पासाठी ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून खर्च करण्यात येतो, या प्रकल्पाची अमलबजावणी करण्यासाठी राज्यशासनाने दिल्लीच्या CSC-SPV या कंपनीची नेमणूक केली या कंपनीने महाराष्ट्रातील E- Governance Solutions Private Limited  व S2 Infotech International Limited या उपकंपन्यांना प्रकल्पाचे काम दिले.या ३ कंपन्यांनी मिळून गावच्या विकासासाठी असलेल्या १४ व्या वित्त आयोग योजनेतील निधी प्रकल्पाच्या नावाखाली घेतला असून डिसेंबर २०१६ ते फेब्रुवारी २०२० या कलावधीत स्टेशनरी, हार्डवेअर च्या नावाखाली ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला असून संगणकपरिचालकांचे मानधन सुद्धा मोठ्या प्रमाणात हडप केले आहे.याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,ग्रामविकासमंत्री ना.हसनजी मुश्रीफ यांना निवेदन देऊन CSC –SPV कंपनीसह उपकंपन्यांच्या संचालकावर कारवाई करावी तसेच CSC-SPV कंपनी व शासनाचा आपले सरकार प्रकल्पाचा करार ३१ मार्च २०२० रोजी संपत असून या कंपनीला मुदतवाढ  न देता सर्व संगणकपरिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती देण्याची मागणी केली आहे.

25 comments:

 1. कार्यवाही तर झालीच पाहिजे
  आणि आय टी महामंडळ मध्ये नियुक्ती मिळालीच पाहिजे नाहीतर मुंबई जॅम करायला वेळ नाही लागणार

  ReplyDelete
 2. आय टी महामंडळ मध्ये नियुक्ती मिळालीच पाहिजे

  ReplyDelete
 3. राज्यातील सर्व संगणक परिचालकांना शासनाने कायमस्वरुपी नियुक्ती देऊन गेल्या दहा वर्षांपासून कंपनीकडून संगणक परिचालकांवर होणारा अन्याय थांबवावा हिच विनंती

  ReplyDelete
 4. उद्धव सरकार सुद्धा तोंडाला पाने पुसणार का?

  ReplyDelete
 5. फक्त आय टी महामंडळ

  ReplyDelete
 6. आय टी महामंडळातर्फे नियुक्ती मिळेपर्यंत माघार नाही

  ReplyDelete
 7. It... महामंडळमध्ये नियुक्ति दिल्याशिवाय यावेळी मुंबई सोडायची नाही. खुप छळ होतोय संगणक परिचालकांचा...

  ReplyDelete
 8. It मंडळ मार्फत नियुक्ती

  ReplyDelete
 9. जो पर्यंत सर्व संगणक परिचालक यांची आय टी महामंडळा कडून नियुक्ती मिळत नाही तो पर्यंत माघार नाही घेतली पाहिजे

  ReplyDelete
 10. आता बस खूप झाले, आय टि महामंडळ म्हणजे, आय टि महामंडळ.

  ReplyDelete
  Replies
  1. फक्त आय टी महामंडळ

   Delete
 11. Sarv sangank parichalkana it mandlat samavun geun twarit mandhnat vadh keli pahije

  ReplyDelete
 12. आर माघार नाही फक्त आयटी महामंडळ

  ReplyDelete
 13. आत्ता माघार नाही, राडा म्हणजे राडा, या सरकारला आपली औकात दाखवल्या शिवाय पर्याय नाही.

  ReplyDelete
 14. ऊद्दवा अजब तुझे सरकार

  ReplyDelete
 15. या सरकारला आयटी महामंडळ मधून नियुक्ति देण्यास भाग पाडूच तेव्हाच परत फिरू होऊनच जाऊ दया आरपार

  ReplyDelete
 16. नियुक्ती पत्रा शिवाय माघार नाही.

  ReplyDelete
 17. या सरकार मधले जेवढे आमदार आम्हाला फडणवीस सरकारच्या काळात पाठिंबा द्यायला आले होते त्यांनी एकदा आमचा विचार करावा
  सध्या सत्ता तुमचीच आहे त्यामुळे आता काही अडचण येणार नाही

  ReplyDelete
 18. Kay honar samjena jhale ka He sarkar sudhha pahily sarkar sarkhe karnar ki Kay ? Tase jar jale na ya aplya lokshahi la kahich arth uraycha nahi

  ReplyDelete
 19. It महामंडळ मधून नियुक्ती झाली पाहीजे

  ReplyDelete
 20. It महामंडळ कडून नियुक्ती पाहिजे

  ReplyDelete
 21. It महामंडळ नियुक्ती करण्यात आली तर छान पण ps zp ची जॉइयनिग कधी हे सांगा 5 वर्ष निघून चालले यावर काही प्रतिक्रिय उपास मारीची वेड आली होती आता आत्महत्या केल्याशिवाय काहीउरले नाही काय खाणार नि परिवाराला काय पोषणार सांगा साहेब तुम्ही आम्ही काय करायचे

  ReplyDelete
 22. IT MANDAL NIYUKTI DENEBABAT..

  ReplyDelete
 23. आपल्याला it महामंडळात नियुक्ती मिळाल्याशिवाय माघार घेयाची नाही

  ReplyDelete