तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

महिला महाविद्यालयाची अभ्यासपूर्ण क्षेत्रभेट


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-
       क्षेत्रभेटीसारखे उपक्रम विद्यार्थ्यांच्या ज्ञानासोबतच अनुभवामध्ये ही भर घालत असतात. याच हेतूने भौतिकशास्त्र विभागातर्फे काढलेली कै. लक्ष्मीबाई देशमुख ‍महिला महाविद्यालयाची‍ क्षेत्रभेट  काल संपन्न झाली.या अभ्यास ‌क्षेत्रभेटी अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी , नॅचरल शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज रांजणी,ता. कळंब येथे भेट दिली. साखर कारखाना, सोलार प्लांट, को जनरेशन इलेक्ट्रिक प्लांट , बायोगॅस प्लांट,इथेनॉल प्लांट, डिस्टिलरी प्लांट यानां भेट देऊन माहिती घेतली. विशेष म्हणजे हे सर्व प्लांट झिरो वेस्ट या संकल्पनेवर चालतात अशी माहिती मिळाली . या प्रकल्प भेटीबरोबरच नॅचरल डेअरी प्रकल्पालाही विद्यार्थीनींनी भेट दिली . त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून प्रकल्पविषयक माहिती संकलित केली. प्रत्येक प्रकल्पातील तज्ञ व्यक्तींनी प्रकल्पाबाबत इत्थंभूत माहिती देवून प्रकल्प कसा चालतो , त्यात कोणता वैज्ञानिक नियम काम करतो, इत्यादी सर्व सविस्तर माहिती दिली .
        कै .लक्ष्मीबाई देशमुख शिक्षण प्रसारक मंडळ व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ . आर .जे.परळीकर यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या क्षेत्रभेटीमध्ये विद्यार्थिनींसोबत भौतिकशास्त्र विभाग प्रमुख प्रा . डॉ .विवेकानंद कवडे प्रा . अरूण चव्हाण व सौ . हे .गो. दुधाट यांनी सहभाग नोंदवला .

No comments:

Post a comment