तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Wednesday, 12 February 2020

वैद्यनाथ कॉलेज, लोकशाही पंधरवाडा साजरा मतदान हे दाम नव्हे दान आहे- प्रा.नारायण पाळवदे


लोकहित जपणाराच लोकप्रतिनिधी लोकशाहीचा खरा पाईक-प्रा . डॉ . माधव रोडे


परळी - वैजनाथ (प्रतिनिधी) :-  येथील वैद्यनाथ कॉलेजच्या राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि . २६ जानेवारी २०२० ते १० फेब्रुवारी २०२० यादरम्यान लोकशाही पंधरवाडा साजरा करण्यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन दि . २६ जानेवारी रोजी प्राचार्य डॉ . आर . के . इप्पर  यांच्या हस्ते  झाले . त्यावेळी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा .  डी . के . आंधळे, प्रा . डॉ . माधव रोडे , प्रा . नारायण पाळवदे, प्रा . मंगला गडम मॅडम उपस्थितीत होते. लोकशाही  पंधरवाड्यात निमित्ताने मतदान जनजागृती पोस्टर, लोकशाही मजबुतीकरण व लोकशाहीची शपथ घेण्यात आली, निबंध, वक्तृत्व स्पर्धो, शहरात , ग्रामिण भागात चौका- चौकात मतदार जनजागृती माहिती पत्रक  वाटप करण्यात आले . तर लोकशाही सदृढ व्हावी , जागरूक मतदार , लोकशाहीचा आधार व्हावा या विषयावर दि . १o फेब्रुवारी रोजी प्रा . डॉ . माधव रोडे यांच्या व्याख्यांचा कार्यक्रम संपन्न झाला त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा . नारायण पाळवदे होते . यावेळी लोकशाहीवर मार्गदर्शन करताना प्रा  डॉ . माधव रोडे म्हणाले, लोकहित जपणारा लोकप्रतिनिधीच लोकशाहीचा खरा पाईक असतो, हे मतदार राज्याने ओळूख मतदान करावे, आजची युवा पिढीही लोकशाहीचा आधारस्तंभ असून न्याय  , स्वातंत्र्य, समता, बंधुत्ता हि मुल्ये आपण सर्व भारतीयांनी जपली पाहिजे त्यात राष्ट्रहित दडले आहे . जात,  धर्म, पंथ, प्रांत, यावर प्रेम करण्यापेक्षा राष्ट्रावर प्रेम करा, प्रथम भारतीय नंतर पंथ, जात, व धर्म , भेदभाव मुक्त झाल्याशिवाय भयमुक्त समाज होणार नाही हे युवकांनी लक्षात ठेवावे, क्रिकेट सामन्यातील राष्ट्रभक्ती प्रत्यक्ष दैनंदिन जीवनात दाखवावी, राष्ट्रहितासाठी दैनंदिन  जीवनातले सामने षटकार मारून जिंकावेत असे प्रा माधव रोडे म्हणाले .  यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्रा . नारायण पाळवदे म्हणाले, मतदान हे दाम नव्हे दान आहे यांची जाणिव ठेवा, जागरूक व्हा , सध्या भांडवलशाही आणि नौकरशाही ही लोकशाहीला लागलेली किड आहे. नोकरशाहीच्या व लोकप्रतिनिधीच्या भ्रष्टाचारामुळे व भांडवलशाहीच्या शोषणामुळे लोकशाहीवरील  निष्ठा कमी होत चाललेली आहे . त्यासाठी जनकल्याणाचे काम करणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज आज आहे . यावेळी विविध निबंध, वक्तृत्व, पोस्टर, सुविचार , मतदान जागृती करण्याऱ्या उपक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या २५ विद्यार्थींना प्रमाणपत्र , बक्षीस - स्मृती चिन्हे देऊन उपस्थिती मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला . कार्यक्रमाचे प्रस्ताविक राज्यशास्त्र  विभाग प्रमुख प्रा . डी . के . आंधळे यांनी केले . तर सुत्रसंचलन प्रा . दिलीप गायकवाड, आभार संकेत टाक यांनी मांडले.

No comments:

Post a comment