तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Thursday, 13 February 2020

लिंबुटा येथील जि.प. प्राथमिक शाळेत शैक्षणिक गुणवत्तेसाठी संवाद कार्यक्रम



 परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- तालुक्यातील मौजे लिंबुटा येथे जि.प.प्राथमिक शाळेत मंगळवार, दि ११फेब्रुवारी २०२० रोजी दुपारी ४ .०० वा. तिसरा संवाद कार्यक्रम घेण्यात आला.
सादग्राम निर्मिती प्रकल्प समिती आणि ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात इयत्ता १ ली ते ४थी च्या   विद्यार्थ्यांंना परळी येथील नागनाथ निवासी विद्यलयाचे मुख्याध्यापक विष्णुदास चव्हाण सर यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांमध्ये,शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, शाळेची
शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी या संवाद कार्यक्रमाचे आयोजनमहिण्यातून एक वेळा केले जाते. या संवाद फेरीत
मागील संवाद फेरीनंतर विध्यार्थ्यांमध्ये झालेला सकारात्मक बदल पहण्यात आला.इंग्रजी, गणित व मराठी या विषयांसंदर्भातील त्यांच्या जाणिवांचीही चाचपणी करण्यात आली.विद्यार्थ्यांमध्ये यां विषयांसंदर्भात परि
पक्वता यावी,यासाठी यावेळी काही उपाय सुचविण्यात आले.
या संवाद कार्यक्रमातून मुलांमध्ये चांगले सकारात्मक बदल होत असल्याचे निदर्शनास आले. शाळेच्या सहशिक्षिका मनोरमा भाऊराव घुमे मँडम या विद्यार्थ्यांवर अधिक मेहनत घेत आहेत.
या संवाद कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक आर.पी.जाधव सर,मनोरमा घुमे मँडम,सादग्राम निर्मिती प्रकल्प समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक लिंबाजी मुंडे हे उपस्थित होते.

No comments:

Post a comment