तेजन्यूजहेडलाईन्सचा तिसऱ्या वर्धापण दिन व दिवाळी निमित्त सर्व वाचकांना हार्दिक शुभेच्छा!

Sunday, 23 February 2020

'शिवपुत्र संभाजी' महानाट्याच्या नियोजनार्थ नाथ प्रतिष्ठानची महत्वपूर्ण बैठक ; सर्व पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन


परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  :- दि.२२........ राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून येत्या २८ तारखेला शहरातील वैद्यनाथ महाविद्यालयाच्या समोरील प्रांगणात महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे निर्मित 'शिवपुत्र संभाजी' या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. याच्या पूर्वतयारी व नियोजनार्थ अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक उद्या रविवार (दि.२३) रोजी दुपारी ४.०० वा. ना. धनंजय मुंडे यांच्या 'जगमित्र' या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीदरम्यान महानाट्यामधील बैठक व्यवस्थापनासह, सर्व प्रकारचे नियोजन व विविध जबाबदऱ्यांचे वाटप करण्यात येणार असून त्यासाठी नाथ प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व शिवप्रेमी नागरिक यांच्या विशेष समित्या नेमण्यात येणार आहेत. यासाठी या महत्वपूर्ण बैठकीला नाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, सदस्य व सर्व शिवप्रेमी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

येत्या २८ व २९ फेब्रुवारी व ०१ मार्च असे तीन दिवस दररोज संध्याकाळी ०७ ते १० असे या नाटकाचे प्रयोग होणार असून सिनेअभिनेते खा. डॉ. अमोल कोल्हे हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर अभिनेते रवी पटवर्धन यांनी औरंगजेबाची भूमिका साकारली आहे. या व्यतिरिक्त महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शन पुणे यांचेकडील जवळपास १०० कलाकार व १५० स्थानिक कलाकार अशा २५० कलाकारांसह घोडे, बैलगाड्या यांच्यासह भव्य शिवसृष्टी उभारली जाणार आहे. तरी या महानाट्याच्या यशस्वी आयोजनासाठी होत असलेल्या महत्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन नाथ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment